प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अवमान केल्याप्रकरणी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल दोघांस शिक्षा द्यामुदखेड (मोहम्मद हकीम पत्रकार) शहरातील मुस्लिम समाजकडून आज शुक्रवारची प्रार्थना पठण करून दुपारी ठीक 02.30 वाजता तहसील कार्यालयात प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अवमान केल्याप्रकरणी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल दोघांस शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदन सादर करून महामहीम राष्ट्रपती यांना कळवावे असे सांगितले .

मागील काही दिवसांखाली एक वृत्तवाहिनवरील मुलाखतीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल ह्या दोघांनी द्वेष भावनेतून मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अवमान करून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून या प्रकरणी ताबडतोब भारतीय जनता पार्टीने दोन्ही प्रवकत्यांना निलंबन केले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले त्याअनुषंगाने आज मुदखेड शहरातील मुस्लिम समाजाकडून तहसिलदार यांचे प्रतिनिधी म्हणून पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार शिवाजी पाटील जोगदंड यांनी मुस्लिम समाजाकडून निवेदन स्वीकारुन पुढील कार्यवाही साठी पाठवू असे आश्वासन दिले.

 या वेळी हफीज मोहम्मद अतीक, हफीज मोहम्मद इमरान रझा, मुफ्ती मोहम्मद नयूम, मुफ्ती सुलेमान, मौली अश्फाक, मौलाना जमील, हफीज अब्दुल रहीम 
माजी उपाध्यक्ष बंदेली खान पठाण, माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब, माजी नगर सेवक अब्दुल सलाम सर, माजी नगर सेवक बबलू सेठ,  मदिना मस्जिद चे अध्यक्ष मोहम्मद युसुफ साहेब, मोहम्मद रफीक, शेख बाबू , मोहमद अहेमद आदी सह इतर मुस्लिम समाजातील युवकांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post