ऑलम्पिक असोशियन नांदेड ने क्रीडा क्षेत्राला पाठबळ द्यावे - माजी शिक्षणमंत्री डी. पी . सावंत.....

               


              

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ओलंपिक असोसिएशन  नांदेड  ,जिल्हा क्रीडा कार्यालय  ,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑलिंपिक क्रीडा   सप्ताहाच्या सायकल रॅलीला मोठ्या प्रमाणात लाभलेला प्रतिसाद पाहता नांदेड ऑलिंपिक संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून उभरत्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पाठबळ देण्याचे आवाहन माजी शिक्षण मंत्री मा.डी पी सावंत यांनी केले .ते सायकल रॅली च्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे ओलंपिक असोसिएशन नांदेड चे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश पारे  ,अवतारसिंग रामगडिया  ,विक्रांत खेडकर  ,जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार  ,स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे ,ऑलिम्पिक संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड  कोषाध्यक्ष प्राध्यापक जयपाल रेड्डी  ,किरण चौधरी  ,शिवाजी डहाळे  ,वृषाली पाटील जोगदंड  , प्रलोभ कुलकर्णी , शिवकांता देशमुख , बाबुराव खंदारे प्राचार्य बळीराम लाड , डॉ. दिनकर हंबर्डे . डॉ . राहुल वाघमारे  ,एकनाथ पाटील  ,सायकलिंग संघटनेचे ज्ञानेश्वर सोनसळे,राजुरी स्टीलचे विशाल मुधोळकर  ,गोविंद मुळे , प्रशांत वावधाने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पोलीस दलातील सायकलपटू साईनाथ सोनसळे यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे यांनी सदरील सायकल रॅलीत स्वतः सायकल चालवत सहभागी होत खेळाडूंना प्रोत्साहित केले  .सायकल रॅली साठी चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पीएसआय श्री देवकते साहेब व त्यांच्या पोलीस टीमचा मान्यवरांच्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागोराव अंबटवार संजय चव्हाण  ,निलेश खराटे  ,गोविंद पांचाळ ऋषिकेश टाक  ,शिवाजी केंद्रे  ,मालोजी कांबळे , मोहन नायगावकर  ,विद्यानंद भालेराव सुभाष धोंगडे , अतुल गोडबोले  ,राहुल लिंबोळी  ,मंगेश केंद्रे , राज साळुंखे  ,आकाश गायकवाड  ,अमरनाथ मोरे राहुल चंदेल  ,पूजा राठोड  ,अश्विनी एसके यांनी मेहनत घेतली  .यावेळी दिनांक 25 जून २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड यांनी दिली  .त्यामध्ये नोबल फुटबॉल क्लब च्या वतीने 25 26 जून रोजी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन इंदिरा गांधी मैदान येथे एन आय एस प्रशिक्षक अथर कुरेशी ,  अहमद अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान जिल्हा क्रीडा कार्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . त्यात जिल्ह्या सह शहरातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटना अध्यक्ष रमेश पारे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपीले , डॉक्टर अंकुश देवसरकर , किरण चौधरी  डॉ. रमेश नांदेडकर स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post