नुपुर शर्मा यांचा निषेधार्थ धर्माबाद मुस्लिम बांधावाचा महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन.आज धर्माबाद येथे इस्लाम धर्माचे प्रेरीत हजरत मोहम्मद सल्ल. यांच्यावर 27/05/2022 रोजी टाइम्स नाऊ या टीव्ही चॅनल वर नुपूर शर्मा यांनी आक्षेपहर्या भाषेत टीपणी केल्याबद्दल, इस्लाम धर्माचा अपमान करून समस्त मुस्लिम बांधवाचे मन दुखावले आहे. यामुळे  नुपुर शर्मा व टाइम्स नाऊ  या टीव्ही चॅनेलवर योग्य ती भारतीय संविधानानुसार त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी धर्माबाद इंतेजामिया कमिटी जामा मस्जिद  व सर्व मुस्लिम बांधवांनी तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती महोदयांना एक निवेदन पाठविण्यात आले. यावेळी मोईन खान(जामा मस्जिद नायब सदर), हाजी अल्ताफ( सदर दारूलूम गोसे आजम दस्तगीर) , युनूस खान( मा. नगरसेवक), मोहम्मद नाहीद समी (मराठवाडा अध्यक्ष शेर ए अली सोशल फाउंडेशन महा राज्य), मो. जावेद ( शहराध्यक्ष रा.काँ पा.),
बाबा सेठ( समाज सेवक),मौलाना गफ्फार, शेख जलाल (सदस्य जामा मस्जिद) , यूसुफ रजवी (सदस्य जामा मस्जिद), शेख आबेद .

Post a Comment

Previous Post Next Post