मोहम्मद मुफसिरोद्दीन यांची राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती
नांदेड दि.१० येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते मोहम्मद मुफसिरोद्दीन यांनी मागील काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी नियुक्ती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  जेष्ठनेते भगवानराव पाटील अलेगावकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस डी. बी. जांभरूनकर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस परशुराम वरपडे ,शिक्षक नेते यशवंत कांबळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजिंक्य देशमुख,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहम्मद मुफसिरोद्दीन यांनी विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रवादी युवक कांग्रेस मध्ये सक्रिय असे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्या बरोबरच समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवून आपल्या कार्याची सक्रियता दाखवून दिली. त्यामुळेच त्यांची राष्ट्रवादी युवक एक काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाने दिलेली महत्त्वपूर्ण जबाबदारी आपण निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडू असा विश्वास त्यांनी दाखविला या निवडीबद्दल त्यांचे शेख शावेस, लखन सोनसळे , रितेश पावणेकर आदीनी हार्दिक अभिनंदन केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post