कृषी संजीवनी मोहिमेचा लोंढेसांगवी येथे शुभारंभ


नांदेड दि. 25 :- कृषि विभाग  व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत कृषि संजीवनी सप्ताह-2022 चा शुभारंभ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या हस्ते सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने पेरणी करून लोहा तालुक्यातील लोढेसांगवी या गावात करण्यात आला. मूल्य साखळी  दिनानिमित्त मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) समुदाय आधारीत संस्थाची मूल्यसाखळी विकास शाळा खरीप हंगाम सन 2022 अंतर्गत गोविंद प्रभू शेतकरी उत्पादक कंपनी लि. लोंढे सांगवी येथे आयोजित करण्यात आली. यावेळी बीज प्रक्रिया व जागर तंत्रज्ञानाचा अंतर्गत बीबीएफवर पेरणी करण्यात आली.   

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक नांदेड चलवदे,  प्रकल्प उपसंचालक आत्मा श्रीमती माधुरी सोनवणे , लोहा तालुका कृषि अधिकारी अरून घुमनवाड,  आत्माचे  तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल या सर्वांनी कृषि संजिवनी सप्ताह विषयी मार्गदर्शन केले. रोहित कंपनीचे  व्यवस्थापक टोंपे यांनी बीबीएफ यंत्राची सविस्तर माहिती दिली. सौ. लक्ष्मीबाई मारोती लोंढे यांच्या शेतावर बि.बि.एफ.द्वारे पेरणी करण्यात आली.  गोविंद प्रभु या  शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मारोती किशन लोंढे, संदीप रामजी लोंढे, दिगांबर गुणाजी लोंढे, विठ्ठल कदम, सौ.रेखा व्यकंटी लोंढे व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित  होते.

000000

Post a Comment

Previous Post Next Post