मुहम्मद पैगंबर वर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माला अटक करण्याची मागणी


 भारताच्या गृहमंत्र्यांना एमडिओ संघटनेचे निवेदन

परभणी: (मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी) परभणीयेथील मायनॉरिटी डेव्हलपमेंट योजनेंतर्गत संघटनेच्या वतीने भारताचे गृहमंत्री यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की दिल्लीतील भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत दोघांनाही तत्काळ अटक करण्याची मागणी भारतासह बाहेरून सुध्दा होत अशा प्रकारच्या वक्तव्यातून केवळ हिंसाचारच घडत नाही तर सामाजिक विभाजनही होते आहे सरकारने नुपूर शर्मा व नवीन जिंदाल प्रकरणात तात्काळ कारवाई करावी नुपूर शर्मा यांना पोलिसांनी 22 तारखेपर्यंत जो वेळ दिला आहे तो आम्हाला मान्य नसून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहे भाजपाने त्यांना पक्षातून निलंबितही केले असले तरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात विविध ठिकाणी पन्नासहून अधिक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत  यामुळे फक्त हा आमच्या मातीचा अपमान नाही तर हा देशाचा अपमान आहे महत्वाच्या पदावर बसलेले जबाबदार व्यक्तीवर यामुळे ताशेरे ओढले जात असल्याने नूपुर शर्मा नवीन जिंदाल सारख्या दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाई करून नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांना अटक करण्याचे आदेश भाजपकडुन देण्यात यावे अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट योजनेंतर्गत संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे या निवेदनावर मेहबूब खान पठाण , सय्यद रफिक पेडगावकर , शेख उस्मान शेख इस्माईल , शेख शमशोद्दीन ,शेख अमिन पटेल आदिंचे स्वाक्षरी आहे

Post a Comment

Previous Post Next Post