हिमायतनगर शहराला पावसाने धो धो धुतले... राष्ट्रीय महामार्ग ६ तास ठप्प; नागरिकांच्या घरात घुसले पाणी शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; नगरपंचायत व ठेकेदारच्या नाकर्तेपणा उघड


हिमायतनगर, अनिल मादसवार| मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने सकाळी ७ वाजता पासून जोर वाढवत हिमायतनगर व शहर परिसरातील चांगलेच धुतले आहे. या अतिमुसळधार पावसामुळे परिसरातील रान शिवारात पाणी साचले असून, हेच साचलेले पाणी शहरातील सखल भागात असलेल्या नागरिकांच्या घरामध्ये घुसुन गृहउपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून, शहरातील मुख्य कमानीजवळ आणि रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने २०१३ सारखी परिस्थिती उद्भवली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे ६ तास वाहतूक ठप्प झाली होती. पुराचे पाण्यापासून शोक होऊ नये म्हणून हिमायतनगर पोलिसांनी बंदोबस्त ठेऊन वाहनधारकांना पाण्याजवळ जाण्यापासून रोकले होते. यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर निघणे अवघड झाले असून, नाल्याची घाण पाणी गोर गरिबांच्या घरात शिरत असंल्याने साथीचे आजर पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकारास नगरपंचायत प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराचा नाकर्तेपणा आणी राजकीय नेत्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.  


हिमायतनगर नगरपंचायतीने मागील पंचवार्षिक काळात कोट्यवधींच्या निधीतून विकास कामे झाली तर शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र ठेकेदार आणि नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे शहर व परिसराला पर्जन्य परिस्थितीचा फटका सहन करावा लागतो आहे. हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर नागरिकांची समस्या मार्गी लागतील असे वाटले होते. मात्र ती अपेक्षा सपशेल खोटी ठरली असल्याचे शहरातील चिखलमय, खड्डेमय आणि टॉलेमय झालेल्या  वाहत्या पाण्याची वाट मोकळी करण्यात यश आले नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून रात्र जागून काढण्याची वेळ अनेक वार्डातील लोकांना अली आहे. एवढेच नाहीतर पाणी पुरवठ्याच्या नावाखाली ठेकेदारांनी अनेक प्रभागात रस्ते खोदून ठेवल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.  


आजच्या मुसळधार पावसाने येथील रान शिवारात साचलेलं पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने पुराच्या पाण्यामुळे शहर परिसरातील घरांना वेढा पढला आहे. या पावसाने गल्लीबोळात तळे साचले असून, नाल्याची दुर्गंधी आणि पावसाचे पाणी साचून राहिल्यान नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. या प्रकारामुळे नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असताना देखील नगरपंचायत प्रशासनाचे नागरिकांना निर्माण होणाऱ्या या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. एकूणच शहरात निर्माण झालेल्या पर्जन्य परिस्थितीला नगरपंचायतीचा भोंगळ कारभार आणि राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांचा नाकर्तेपणा व राजकीय नेत्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचे आरोप केले जात आहेत.


राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारच्या नाकर्तेपणा

हिमायतनगर शहरातून झालेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराणे रस्त्याचे व शहरानजीकच्या पुलाचे काम केले नसल्याचे आज रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या अलीकडील पुलावरून पूर आला होता. तब्बल ६ तासानंतर पूर ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली असली तरी यामुळे कोणत्याही अनुचित घटना घडवू नये म्हणून ताटाकल येथील पुलाचे व अर्धवट रस्त्याचे काम मार्गी लावणे गरजेचे असल्याचे मत वाहनधारक, प्रवाशी व शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.


नांदेडला जाणारी रुग्णवाहिका तासभर अडकून पडली

राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने इस्लपूर भागातील हुंडी येथील एका रुग्णाला डिलिव्हरीसाठी नांदेडला जायचे होते. मात्र पुरामुळे रास्ता बंद पडल्याने रुग्णवाहिका हिमायतनगर शहराजवळ तासभर अडकून पडली. पूर ओसरत नसल्याचे दिसल्याने लांब पल्ल्याच्या मार्गाने रुग्णवाहिकेला काढून देण्यात आले आहे. असे असताना वारंवार पावसामुळे बंद होणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहता अतिगंभीर रुग्णांना केवळ वाहतूक ठप्प होऊन आपला जीव गमावण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.

Post a Comment

Previous Post Next Post