श्यामसुंदरजी शिंदे यांच्या उपस्थितीत लोहा,कंधार मतदारसंघाच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

 आज लोहा तहसील ऑफिस येथे लोहा,कंधार मतदारसंघाचे भाग्यविधाते,कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट,लोकप्रिय आमदार माननीय श्री.श्यामसुंदरजी शिंदे साहेब व लोकप्रिय युवा नेते आदरणीय श्री.विक्रांत दादा शिंदे यांच्या उपस्थितीत लोहा,कंधार मतदारसंघाच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न... 
आज लोहा तहसील ऑफिस येते लोहा,कंधार मतदारसंघामध्ये अतिवृष्टी व पावसामुळे शेतीचे नुकसान,रस्त्याचे नुकसान, पुलाचे नुकसान तसेच लोहा,कंधार तालुक्यामध्ये चालू असणारे अवैध दारू विक्री,जुगार,मटका, गुडगुडी,गुटखा यासारखे अवैध धंद्याच्या संदर्भात आढावा बैठक लोहा तहसील येथे घेण्यात आली.  आदरणीय आमदार शिंदे साहेबांनी दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना सांगितले की शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टी आणि पावसामुळे शेतीचे नुकसान झालेलं आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करण्यात यावेत. तसेच रोडच्या संदर्भात व पुलाच्या संदर्भात सुद्धा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लाईटच्या संबंधात शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना लाईटच्या संदर्भात हेळसांड होता कामा नाही.  अशा प्रकारे सूचना लाईट विभागाच्या अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लोहा,कंधार तालुक्यामधील जे अवैध दारू, गुटखा,मटका,गुडगुडी जे चालू आहे. त्या संदर्भात सुद्धा कार्यवाही करण्यास सूचना करण्यात आल्या. मतदारसंघातील गोरगरीब,पीडित,शोषित,वंचित, दलित,अपंग,निराधार लोकांच्या संदर्भात गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. 


 व सर्वसामान्य माणसांचे काम तात्काळ झाले पाहिजे.कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही.  याची काळजी घ्यावी. व मतदारसंघातील सर्वसामान्य माणसाला प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून योग्य असा न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारे एक नाही अनेक मतदारसंघातील अडीअडचणीच्या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून येणाऱ्या पुढच्या काळात मतदारसंघातील विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी कायद्याच्या अधीन राहून. नियमाने गोरगरीब नागरिकांची सेवा करावी. अशा प्रकारे सूचना माननीय आमदार शिंदे साहेब यांनी केल्या. यावेळी चंद्रसेन पाटील जिल्हा परिषद सदस्य माळाकोळी, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर चोंडे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार,संदीप पाटील उमरेकर खरेदी विक्री संघाचे सभापती लोहा, कंधार कृषी बाजार समितीचे उपसभापती अरुण पाटील कदम,माधवराव बाबर,तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब,पोलीस उपविभागीय अधिकारी मारोतराव थोरात,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहन पवार,लोह्याचे पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. सोनकांबळे साहेब, लोहा कृषी अधिकारी एस. एन. पोटपेलवार, नायब तशिलदार अशोकराव मोकले साहेब, गटशिक्षणाधिकारी सोनटक्के साहेब,लोह्याचे जे. ई. सार्वजनिक बांधकाम विभाग चमकुरे साहेब,आर.डी. कुंभारे जिल्हा परिषद शाखा अभियंता, लाईट विभागाचे एम. ए. सि. बी.चे उपअभियंता दवंडे साहेब, कंधारचे एम. ए. सी. बी. चे एस. के. राऊत साहेब, कंधारचे गटशिक्षणाधिकारी केंद्रे बी.एन, कंधार येथील बि.डि.ओ. एस.एन मांजरमकर,लोहा येथील बि.डी.ओ. एम.एच.वावळे व सर्व विभागाचे अधिकारी,पदाधिकारी कर्मचारी, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत लोहा,कंधार मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब नागरिकांच्या प्रश्नावर व अडीअडचणीवर आढावा बैठक आज संपन्न झाली.

Post a Comment

Previous Post Next Post