जेष्ट पत्रकार जी.पी मिसाळे यांना प्रबुद्ध भारत पुरस्काराने सन्मानित

.

 

धर्माबाद (कलिदास अनंतोजी) महाराष्ट्रातील ख्यातनाम महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी महोत्सव दिनी धर्माबाद येथिल आंबेडकर चळवळीतील जेष्ट पत्रकार जी . पी . मिसाळे यांना प्रबुद्ध भारत पत्रकारीता पुस्काराने सन्मनित करण्यात आले आहे .
    दि . २८ ऑगस्ट २०२२ रोजी महाकवी वामनदादा कर्डक जन्म शताब्दी महोत्सव पर्व १७ व्ये कै . शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रबुद्ध भारत पत्रकारीत पुस्कार देण्यात आला आहे 
 जी .पी .मिसाळे सर हे पुरोगामी आंबेडकर चळवळीतील नेते असुन त्यांनी बाबळी बंधारा कृती समिती , रेल्वे संघर्ष समिती सदस्य म्हणून सामाजीक चळवळीत ही संघर्ष केले आहेत .
शैक्षणीक क्षेत्र , धार्मिक क्षेत्र , राजकीय क्षेत्रात ही निपून असल्याने त्यांना अनेक पुरस्कार बहाल झाले आहेत . पुरस्काराने भरले घर असे मिसाळे सर अशी  कविता त्यांच्या नावे करण्यात आली आहे .
जी पी मिसाळे हे पत्रकारी क्षेत्राच्या गेली ४० वर्षा पासुन कार्य करतात या माध्यामातुन अन्याय अत्याचार विरुद्ध निर्भीड पणे लिखान  करून न्याय देण्याचे काम केल्याने त्यांच्या या विविध पैलूंचे कौतुकास्पद कार्याची पावती म्हणून प्रबुद्ध भारत पञकार पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .  
या कार्यक्रमाचे 
अध्यक्ष सदाशिव शितळकर ,
उदघाटक प्राचार्य बाबाराव नरवाडे  , स्वागतध्यक्ष इंजि प्रशात इंगोले 
 प्रो डॉ .राजेद्र गोणारकर , प्रा जे टी जाधव , जे के जोधळे , निर्मलाताई निवडंगे , एम सायलू दादा म्हैसेकर , रेखाताई पंडीत , स ना भालेराव , भिम पवार ' दतुकाका वाघमारे , अॅड देवकरे , इंजि सोनसळे , डी डी भालेराव , डॉ कैलास धुळे , डॉ. रवि सरोदे , सुरेश लोकडे , डॉ. गंगाधर लव्हाळे होते .
प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक  संजय निवडंगे यांनी केले . तर सुरेख सुत्रसंचालन डॉ . विकास कदम यांनी केले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post