पुढील चार दिवसात नांदेड जिल्हयात वादळी वार्यासह अतिवृष्टीचा इशारा




नांदेड दि. 5 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ ते ०८ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी आणि पुढील बाबी कराव्यात

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल • आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखडी वस्तूपासून दूर रहा.५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.या गोष्टी करु नका:

 आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाइन याना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका.२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.४) धातूच्या उच्च मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर धावण्याइतकेच धोकादायक आहे.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांनी  जनतेस केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post