वजीराबाद गुन्हे शोध पथकाकडुन चोरीच्या 30 मोटरसायकली जप्त. (21,80,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त )


नांदेड शहरामध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीच्या गुन्हयांच्या मा. श्री. निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड, मा. श्री. प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा.श्री विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा. श्री. निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्री. चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड शहर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना मासीक गुन्हे बैठकीच्या वेळी सुचना देऊन मो.सा. चोरीच्या गुन्हयांना आळा घालून जास्तीत जास्त मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन मुद्देमाल जप्त करणेबाबत आदेशीत केले.

सदर सुचनांप्रमाणे पोलीस ठाणे वजीराबाद चे ठाणे प्रमुख श्री. जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन वजीराबाद, नांदेड याठीकाणी चालु वर्षात ज्या ज्या ठीकाणी मोटरसायकलीचे गुन्हे घडले आहेत. त्या त्या ठीकाणी जाऊन तेथील सिसिटीव्ही फुटेज चेक करुन गुन्हेगाराचे नांव निष्पन्न करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिल्या

आहेत. पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख श्री. संजय निलपत्रेवार, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, गजानन किडे, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, व्यंकट गंगलुवार, रमेश सुर्यवंशी, अंकुश पवार हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व ठीकाणचे सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीतांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत होते..

वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मोटरसायकलचे चोरीच्या प्रत्येक घटनेच्या ठीकाणी भेटी देऊन माहीती काढण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मोटरसायकल चोरटे हे परभणी येथील असल्याची माहीती प्राप्त झाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परभणी येथे जाऊन श्री. अभिनाश कुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग परभणी शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि खदीर शेख व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कांबळे यांचे मदतीने गुन्हेगारांचा शोध घेतला असता गुन्हेगारी नामे 01. शेख अरबाज ऊर्फ कोबरा शेख चाँद, वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी रा. रा. दर्गारोड, पारवागेट परमणी ता. जि. परभणी 02. आरेज खान उर्फ आमेर पिता अयुब खान, वय 28 वर्षे व्यवसाय टेलर रा. मोठा मारोती देशमुख गल्ली परभणी 03. मोहम्मद मुक्तदीर उर्फ मुक्का मोहम्मद अथर, वय 31 वर्षे व्यवसाय बेकार राहणार शाहीमज्जीद, स्टेडीएम रोड परभणी हे मिळुन आले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वर नमुद गुन्हयातील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.त्यावरुन तीन्ही आरोपीतांनी वेगवेगळया ठीकाणाहून चोरीच्या एकुण (30) मोटरसायकली किंमती 21,80,000/- (एकेवीस लाख आंशी हजार रुपये फक्त ) काढुन दिल्याने त्या जप्त करुन ताब्यात घेण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलीचे वर्णन खालीलप्रमाणे असुन त्यांचेकडुन पोलीस ठाणे वजीराबाद येथील (06), पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील (01), पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील (03), पोलीस ठाणे भाग्यनगर येथील (01), पोलीस ठाणे ईतवारा येथील (02), पोलीस ठाणे गंगाखेड जि. परभणी येथील (05), पोलीस ठाणे कदीम जालना येथील (02), पोलीस ठाणे जालना येथील (01) व पोलीस ठाणे अंबेजोगाई शहर जि. बिड येथील (01) गुन्हा असे एकुण (22) गुन्हे उघडकीस आले असून उर्वरीत गुन्हे उघडकीस आणण्याची प्रक्रीया सुरु आहे.

सदर चोरटयांनी फक्त होंडा युनीकॉन, होंडा शाईन व पॅशन प्रो या मोटरसायकलचे लॉक चार ते पाच महिण्यांमध्ये खराब होत असल्याने आरोपीतांनी नमुद कंपनीच्या गाडयांना टार्गेट करुन त्या बनावट चाबीचा वापर करुन चोरी करीत असल्याची बाब समोर आली आहे.

नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे चोरीचे सर्व गुन्हे उघडकीस आणनेकामी नांदेड जिल्हा पोलीस दल प्रयत्नशील असुन आगामी काळात दिपावली सण हा मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याने सर्व जनतेनी आपले वाहन चोरीस जाऊ नये याकरीता आवश्यकती काळजी घेणे गरजेचे असुन केवळ मोटरसायकलचे लॉकवर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेले उच्च प्रतिचे लॉकचा वापर करावा असे आवाहण श्री. प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी सर्व जनतेस केले आहे.

वरील नमुद आरोपीतांकडुन नांदेड शहरातील बरेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. 30 चोरीच्या मोटरसायकली हस्तगतं केल्याप्रकरणी वरीष्ठांनी पोलीस ठाणे वजीराबाद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post