चोरीस गेलेला सर्व 4,70,200/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
फिर्यादी नामे नजीरखॉन हानुमिया पठाण, वय 41 वर्ष, व्यवसाय मिस्री, रा. तगलाईन गल्ली, मुखेड, जि.नांदेड यांनी पोलीस स्टेशन मुखेड येथे फिर्याद दिली की, दि.24/10/2022 रोजी सकाळी 8.00 वा. चे सुमारास यातील फिर्यादी यांचे नातेवाईक मरण पावल्याने अंत्यविधीसाठी हैद्राबाद येथे गेले होते. अंत्यविधी करुन दि. 25/10/2022 रोजी सकाळी 9.00 वा.चे सुमारास परत घरी आले असता त्यांचे घराचे गेटचे कुलुप तुटलेले दिसले त्यावरुन त्यांनी घराची पाहणी केले असता त्यांचे घरातील कपाटात व पेटीत ठेवलेले 11 तोळे सोने, 37 तोळे चांदी व 5000/- रुपये रोख रक्कम असा एकुण 4,70,200 /- रुपयाचा मुद्देमाल चोरटयाने चोरुन नेल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन मुखेड येथे गुन्हा रजि. क्र. 321/2022 कलम 454, 457, 380 भादवि प्रमाणे अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता..


सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने मुखेड पोलीसांनी गुप्त बातमीदाराचे माहितीवरुन अत्यंत जलदगतीने तपास करुन संशयीत आरोपी नामे आरबाजखान आयुबखान पठाण वय 20 वर्ष, रा. तगलाईन गल्ली, मुखेड जि.नांदेड यास ताब्यात घेऊन त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सदरचा आरोपी हा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सदर आरोपीस अटक करुन तपास करुन सदर आरोपीकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व 4,70,200/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री. विलास गोबाडे, पोउपनि श्री गजानन अन्सापुरे, पोउपनि श्री. नरहरी फड, पोउपनि श्री भारत जाधव, सहा. फौज श्री. चंपती कदम, पोना श्री. दगडाजी धोंडगे, पोना श्री. पांडुरंग पाळेकर, पोकॉ श्री. सिध्दार्थ वाघमारे, पोकॉ श्री.शिवाजी आडबे, पोकॉ श्री. बळीराम सुर्यवंशी, पोकॉ श्री. सचिन मुत्तेपवार, पोकॉ श्री प्रदिप शिंदे, पोकॉ श्री. मारोती मेकलेवाड, चालक पोकॉ श्री. गंगाधर जायभाये यांनी केला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि श्री गजानन अन्सापुरे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post