स्था.गु.शा.ने केला किनवट हरीत गांजाची कारवाई, 52 किलो गांजा जप्त, 03 आरोपी फरार
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना आदेशीत करून अवैध धंद्द्याची माहिती काढून केसेंस करण्यायावत सूचना दिल्या होत्या. त्यावरुन पो.नि.स्था.गु.शा. यांनी त्यांचे अधिपत्याखालोल सपोनि पांडुरंग माने यांचे पथक पो.स्टे. किनवट हडीत पाठवून माहिती काढून फेसेस करण्याचे आदेश दिले.

त्यावरुन सपोनि माने व त्यांचे सोबतचे पोलीस अंमलदार यांनी दिनांक 22/10/2022 रोजी पोलीस ठाणे किनवट होत मौजे चंद्रपुर ता. किनवट शिवारातील जंगलातील उंच व सखल भागातल शेत गट क्र. 15/क मध्ये मालक गंगासिंग सरिचंद साबळे, शेत गट क्र. 15/एच मध्ये मालक किसनसिंग आदु साकळे व शेत गट क्र. 15/च मध्ये आरोपी वजरंग बच्चनसिंग साबळे यांचे शेतात महसुलचे मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीसांनी मिळून छापा टाकला असता, त्यांचे शेतातील कापसाचे उभ्या पिकात अंमली पदार्थ गांजाचे झाडाची लागवड केल्याचे मिळून आले. त्या आरोपीनी घनदाट जंगलाचा व पहाडी भागाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी गाजांचे झाडाची लागवड केलेले मिळून आले. सदर ठिकाणी जाण्यासाठी पायवट असून, हमरस्त्यापासून 4-5 कि.मी अंतरावर दुर्गम पहाड़ी व घनदाट जंगलात असून, त्या आरोपींना पोलीसांची चाहुल लागल्यामुळे जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. पोलीस पथकाने त्यांचेवर छापा कारवाई पूर्ण करुन त्या शेतातुन एकूण 52 किलो 280 ग्रो वजनाचे गांजाचे परिपक्व झाडे किंमती 2,61,400/- रुपयाचा माल जप्त केली. त्यानंतर त्या तोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे किनवट येथे गुरनं. 203/2022 कलम 20 (अ)(ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी नांदेड जिल्हयातील पो.स्टे. किनवट हदीतील मोजे रामपुर गांयो सन 2018 मध्ये गांजा शेतात लागवड करून मोठा व्यवसाय करणान्या एकुण 19 लोकांचे शेतावर स्वा.गु.शा.चे पोलीसांनी छापा मारुन 23 क्विंटल गांजा पकडून मोठी कारवाई केली होती...

सदरची कामगीरी श्री प्रमोदकुमार सेवाळे, पोलीस अधीक्षक, व नूतन पोलीस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे, श्री विजय कवाडे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोलीस अमलदार दशरथ जावळकर, सुरेश पुगे, विलास कदम, मोतीराम पवार, चालक हेमंत विचकेदार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. श्री प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, व नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण फोफाटे यांनी कौतूक केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post