कोवळ बालपण जात आहे नशेच्या विळख्यात.


 नांदेड दि.१० शिक्षण घेण्याच्या वयात अनेक बालकांना पालकांच्या उदासीनतेमुळे आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहान वयापासूनच शिक्षणापासून दूर होण्याची वेळ येत आहे. ही बालके आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भीक मागणे, कचरा गोळा करणे अशा प्रकारची कार्य करत आहेत आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या बालकांमध्ये बालवयात नशा करण्याच्या प्रमाणात लक्षणीय अशी वाढ झाली आहे. बाजारात सहज उपलब्ध होणारे बाम,व्हाइटनर आणि स्टिकफास्ट यांचा वापर करून अनेक आजाण बालके नशेच्या आहारी जाऊन आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत. याकडे प्रशासनाने आणि जागरूक समाजाने वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाहीतर येणारी पिढी ही नशेखोर होण्यास वेळ लागणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post