वरिष्ठ महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्या
 नांदेड दि.१० 2001 नंतर स्था
पन झालेल्या सर्व कायम विनाअनुदानित पारंपारिक वरिष्ठ महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेद्वारे विभागीय सहसंचालक नांदेड यांच्याकडे करण्यात आली.

संपूर्ण भारतात महाराष्ट्र वगळता कोणत्याही राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्व अस्तित्वात नसताना महाराष्ट्रात मात्र गेल्या 21 वर्षापासून अन्यायकारक असे कायम विनाअनुदानित तत्त्व चालू आहे.ज्यामुळे उच्च शिक्षण घेऊन देखील अनेकांना वेठबिगारासारखे राबावे लागत आहे. सेट, नेट आणि पीएचडी अशी उच्च शैक्षणिक पात्रता असून देखील विनावेतन कार्य करावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान घोषित केले पण वरिष्ठ महाविद्यालयांना अजून अनुदान घोषित केले नाही. त्यामुळे विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात कार्य करणाऱ्या प्राध्यापक व कर्मचारी वर्गास हालाखीचे यातनामय जीवन जगावे लागत आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित 2001 नंतरच्या कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मंजूर करावे.अशी मागणी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.उस्मान गणि यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रा. सय्यद वाजिद,प्रा.कोंडेवार, प्रा. कांबळे,प्रा.सोनाळे, प्रा. जोंधळे,प्रा. हाके, प्रा. उमाकांत, प्रा. शिंदे , प्रा. वाघमारे,प्रा.कदम, प्रा.जाधव, प्रा.पवार, यांच्यासह अनेक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post