कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
नांदेड दि.१५ भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब भूकतरे  यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत कै. बानो एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापकअध्यक्ष प्रा.मोहम्मद मझरोद्दीन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास भाऊसाहेब लाकाड,प्रा.चंद्रकांत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सय्यद सलमान यांनी केले तर आभार प्रा. शेख नजीर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सय्यद फराज प्रा.तेहरीम,प्रा.निजाम इनामदार,मोहम्मद मुजफरोद्दीन (फराज)आणि  राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post