हिमायतनगर साबांवि अभियंताच्या आशीर्वादाने शहर व तालुक्यात बोगस कामाचा सपाटा
नांदेड, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय हिमायतनगर येथील उपअभियंता, शाखा अभियंत्याच्या आशीर्वादाने शहर व तालुक्यात बोगस कामे उरकल्या जात आहेत. शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीवर डल्ला मारणारे काही गुत्तेदार सक्रिय झाले. अश्या प्रकारच्या निकृष्ट कामाला उंटावरून शेळ्या हाकण्याऱ्या अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे अभय मिळते आहे. परिणामी शासनाचा निधी धुळीस मिळत असून, ग्रामीण विकासाच्या उद्देशाला हरताळ फसली जात आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी आत्तापर्यंत हिमायतनगर तालुक्यात झालेल्या सर्व कामाची उच्च स्तरीय चौकशी करावी आणि संबंधित गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून अभियंत्यास बडतर्फ करावे अशी मागणी विकासप्रेमी जनतेतून केली जात आहे.


हिमायतनगर शहरातराष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय आहे. या कार्यालयाचा कारभार उपविभागीय तुंगीनवार यांच्याकडे असून, ते ये ठिकाणी न राहता नांदेड सारख्या शहराच्या ठिकाणावर राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचे कामे करता आहेत. हिमायतनगर येथील  कार्यालयाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरु असून, नुकतेच खाजगीत इमारतीचा लोकार्पण आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर परिसरातील सिमेंटी काँक्रेटीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात रस्त्याची कामे सुरु असून, ती कामे देखील थातुर माथूर होत असल्याची ओरड ग्रामदिन भागातील जनतेतून केली जात आहे. अनेक ठिकाणच्या रस्ता कामात अंदाजपत्रकाच्या बगल देऊन चक्क लेयर गायब निकृष्ठ प्रकारचे मटेरियल वापरून गुणवत्ता हीन कामे केली जात आहेत.


अश्या प्रकारे सर्व रस्ते इमारतीचे बांधकाम नियमांना बगल देऊन केले जात असताना याकडे उपअभियंता दुर्लक्ष करून स्वहित साधत आहेत. त्यामुळे गुतेदाराला अभय मिळत असल्यामुळे हिमायतनगर तालुक्यामध्ये बोगस कामाचा सपाटा सुरू आहे. या प्रकारामुळे संबंधित गुत्तेदार निर्ढावले असून मनमानी पद्धतीने कामे उरकून शासनाला चुना लावण्याचे काम करत आहेत. परिणामी शासनाकडून मिळालेल्या निधी वाया जात असून आत्तापर्यंत झालेल्या हिमायतनगर तालुक्यात करण्यात आलेल्या विविध विकास कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी गुत्तेदाराचे नावे काळ्या यादी टाकावी आणि उंटावरून शेळ्या हाकण्याची कामे करणाऱ्या उपअभियत्याची उचल बांगडी करावी अशी मागणी विकास प्रेमी जनतेतून केली जात आहे


हिमायतनगर तालुका हा तेलंगणा विदर्भाच्या बॉर्डरवर असून या ठिकाणी जंगलाच्या काठावर आदिवासी बहुल भाग आहे. तसेच येथील बाजारपेठ मोठी असून विधानसभा मतदारसंघातील हिमायतनगर क्षेत्र हे मजूरदार शेतकरी आणि व्यापारी वर्ग आणि व्यापलेले आहे. हा भाग गेल्या 25 वर्षापासून विकासापासून दूर असून आमदार, खासदार व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर झालेली विविध कामे जोरात सुरू आहेत. सदरील कामांना मंजुरी दिल्यानंतर दिलेल्या मुदतीत कोणतेही कामे होत नसल्यामुळे शासनाच्या विकासाच्या उद्देशाला तिलांजली देऊन अभियंत्याच्या संगनमताने वाढीव निधी मंजूर करून घेत गुत्तेदार व अभियंते आपला स्वार्थ साधत आहेत.


हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काळात झालेल्या रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या खाबुगिरी वृत्तीमुळे आणि राजकीय नेत्याच्या टक्केवारी पद्धतीमुळे विकास कामाचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याची झालेली वाताहत आणि खड्ड्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, वर्षभरातच केलेल्या कोट्यावधीच्या निधीतील रस्त्याच्या धुळीस मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसते आहे. मागील काळात आमदार प्रशांत बंब यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर देखील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रस्ते इमारती समाज मंदिर आणि इतर कोट्यवधींच्या निधीतून होणाऱ्या रस्ते बांधकामाची गुणवत्ता तर वाढली नाही. उलट रस्ते व इतर विकास कामाची गुणवत्ता अधिकच ढासळली असल्याचे चित्र सध्या सुरू असलेल्या कामावरून पहावयास मिळते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post