पोलीस अधिक्षक कार्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी15 ऑक्टोंबर, 2022 शनिवार रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या महापुरुषांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली आहे. मा. श्री प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शानाखाली मा. श्री विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आहे. या प्रसंगी मा. श्री निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. डॉ. सिध्देश्वर मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, इतवारा, पोनि व्दारकादास चिखलीकर, स्थागुशा, नांदेड, पोनि नरुटे, पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड, सपोनि शिवाजी लष्करे, जनसंपर्क अधिकारी व ईतर शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार, कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन पोउपनि उत्तम वाघमारे, सपोउपनि सुर्यभान कांगणे, पोना / संजय सांगवीकर, पोका विनोद भंडारे यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post