मुंबईत पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू; जाणून घ्या कारण

मुंबईत पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत कुठल्याही प्रकारे एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी याची माहिती दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७ नुसार लागू करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक आदेशामुळं पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. त्याचबरोबर कुठल्याप्रकारच्या मिरवणुका काढता येणार नाहीत. त्याचबरोबर या मिरवणुकांमध्ये फटाके फोडणे, लाऊडस्पीकर्स लावणे आणि म्युझिक बँडला देखील बंदी असेल. यामध्ये लग्न समारंभ आणि अत्यंयात्रा यांना वगळण्यात आलं आहे

नागरिकांमध्ये संभ्रम

मुंबई अशा प्रकारे प्रतिबंधात्मक आदेश कशासाठी लागू करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी अद्याप सविस्तर खुलासा केलेला नाही. त्यामुळं मुंबईक नागरिक संभ्रमात असून ट्विटरवरुन ते याबाबत सवाल विचारत आहेत. कुठल्या कारणासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत? अशी विचारणा ते करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post