ओला दुष्काळ जाहीर करा; शिवसेनेचा पोखरणी फाटा येथे रास्ता रोको
परभणी/मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. विमा परतावा देण्यात यावा याकरिता परभणी जिल्ह्यातील पोखरणी फाटा येथे आज  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी ओला दुष्काळातील सर्व सवलती जाहीर करण्यात यावा तसेच विविध मागण्यासाठी शिवसेनाप्रमुख परभणी ग्रामीण तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले पाटील यांनी तहसीलदार यांना वारंवार निवेदन दिले होते.

 निवेदनाची दखल न घेता 19 ऑक्टोबर रोजी पोखरणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार संजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, ग्रामीण तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले, उपजिल्हाप्रमुख माणिकराव आव्हाड, पप्पू वाघ, दामोदर घुले, आत्माराम वाघ, बंडूभाऊ देशमुख, जगदीश सोनवणे, देविदास कच्छवे, गोकुळ लोखंडे, प्रल्हाद लाड, अविनाश कांबळे, कृष्णा गोरे, गोविंद शिंदे, मुंजाजी गिराम, बालकिसन काळदाते, आनंदराव कच्छवे, नागेश वाघ आदी शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनास सहभागी होते.

Post a Comment

Previous Post Next Post