बहुभाषिक पञकार संघाच्या अध्यक्षपदी धडेकर गंगाधर तर सचिवपदी अशोक पडोळे यांची निवड



धर्माबाद (प्रतिनिधी)तालुका बहुभाषिक पञकार संघाच्या अध्यक्षपदी गंगाधर धडेकर

 तर सचिवपदी अशोक पडोळे व उपाध्यक्ष पदी पंडित जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.धर्माबाद तालुका बहुभाषिक पञकार संघाच्या कार्यकरणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे दि:२२ ऑक्टोबर २०२२ रोजी शनिवारी सकाळी ११:०० वाजता शासकीय विश्रामगृहावर बहुभाषिक पञकार संघाची बैठक घेण्यात आली आहे.सदरील बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे.तसेच सर्वानुमते बहुभाषिक पञकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.यात अध्यक्षपदी गंगाधर धडेकर उपाध्यक्ष पंडित जाधव सचिव अशोक पडोळे, कोषाध्यक्ष 

गणेश पा.हतनुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी मार्गदर्शक अंनतोजी कालीदास, कृष्णा तिम्मापुरे,रमेश कत्रुरवार, सुदर्शन वाघमारे,सदस्य - पोतन्ना लखमावाड,

माधव हनमंते , व्यंकटराव डोईवाड,महेश जोशी, धनंजय गायकवाड, बाबुराव गोणारकर , नारायण सोनटक्के, बालाजी बकवाड, नारायण इबितवार, अब्दुल खदीर, विनोद तगडपल्लेवार, यांची उपस्थिती होती.तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post