क'झोन फुटबॉल स्पर्धेत कै. वसंतराव काळे महाविद्यालय उपविजेता
नांदेड दि.१८ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'क'झोन अंतर महाविद्यालयीन मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना श्री  गुरुगोविंद सिंघ अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड आणि कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय यांच्यात झाला अत्यंत अतितटीच्या झालेल्या या सामन्यात काळे वरिष्ठ महाविद्यालयाचा निसटता पराभव झाला. यामध्ये उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन कर्णधार नवीद कुरेशी, मोहम्मद उमेर, खालेद दाद खान,शेख साद,मोहम्मद तकी,व्हीक्टर पिल्लै यांनी केले.


 निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. म्हणून अंतिम निर्णय हा पेनल्टी स्टोक द्वारे करण्यात आला. यामध्ये एका गोल फरकाने काळे वरिष्ठ महाविद्यालयास पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघांनी एकमेकांना तुल्यबळ अशी लढत दिली या संघास क्रीडा संचालक  डॉ. उस्मान गणी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मझरोद्दीन, सचिव प्रा. अर्जूमंद बानो यास्मीन, प्राचार्य डॉ.उस्मान गणी,प्रा.शेख नजीर, प्रा.खान नदीम परवेज,प्रा.अहद कुरेशी,प्रा.भोसले,प्रा.क्षीरसागर,प्रा.कोंडेवार,प्रा.मोहम्मद अतिफोद्दीन,प्रा.सय्यद सलमान,प्रा.बाबासाहेब भुकतरे,प्रा.दानिश,मोहम्मद मुझफरोद्दीन(फराज),अक्षय हासेवाड,मो.मोहसिन यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post