मधुरा रमेश चौरेची राष्ट्रीय धनुर्वीघा स्पर्धेसाठी निवड....
केंद्रीय विद्यालय संघटन फरीदाबाद येथे आयोजित 51 व्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी नांदेडची कुमारी मधुरा रमेश चौरे हिची निवड झाली असून नुकतेच ती स्पर्धेसाठी रवाना झाली आहे  पुणे येथे आयोजित विभागीय राज्य धनुर्विद्या स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकत फरीदाबाद येथे दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2022 दरम्यान केंद्रीय विद्यालय संघटन क्रमांक दोन गुरुग्राम फरीदाबाद येथे आयोजित 51 व्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत नांदेडच्या आर्चरी स्कूल नांदेडची पदक विजेती मधुरा रमेश चौरे ही रिकव्हर प्रकारात 50, 60 ,40 ,30 मीटर मध्ये नेतृत्व करणार असून ती नक्कीच पदक विजेती ठरणार असल्याचे मत धनुर्विद्या प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांनी सांगितले आहे.पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदकी झेप घेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचा जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार पुरुषोत्तम कामतगीकर शिवकांता देशमुख प्रलोप कुलकर्णी किशोर पाठक प्रवीण कोंडेकर संतोष राठोड अगर कुरेशी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून मधुराला शुभेच्छा दिल्या आहेत मधुराही स्टेडियमवर असलेल्या आर्चरी स्कूल नांदेडची खेळाडू असून स्टेडियम व्यवस्थापक तथा उपायुक्त रमेश चौरे यांची कन्या आहे प्रशिक्षिका वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुराची आई व वडील वैशाली रमेश चौरे यांच्या पाठबळामुळे मधुराची पुढील वाटचाल होत. आहे

Post a Comment

Previous Post Next Post