होममिनीस्टर’ला स्पर्धेस हजारो महिलांची हजेरी शिवसेनेचा कार्यक्रम : मंडप खचाखच : आदेश बांदेकरांची हजेरी

        परभणी,(मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी) : शिवसेनेचे उपनेते तथा अभिनेते आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या मंडपात शिवसेनेने आयोजित केलेल्या होम मिनीस्टर या स्पर्धेस हजारो महिलांनी हजेरी लावून उदंड असा प्रतिसाद दिला.
                    शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी  सायंकाळी उशीरा अभिनेते आदेश बांदेकर यांच्याहस्ते झाले. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सौ. ज्योती ठाकरे, आमदार डॉ. पाटील, सौ. संप्रिया पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, संजय गाडगे, अनिल डहाळे, आयोजक सौ. अंबिका डहाळे, नवनीत पाचपोर, अरविंद देशमुख यांच्यासह अन्य नेतेमंडळी व्यासपीठावर विराजमान होती.                  नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या भव्य मंडपात होम मिनीस्टर स्पर्धेच्या निमित्ताने दुपारपासूनच महिलांनी मोठी गर्दी सुरु केली. सायंकाळी उशीरापर्यंत हा भव्यदिव्य मंडप महिलांच्या गर्दीने अक्षरशः फुललेला होता. अभिनेते बांदेकर यांचे मंडपात आगमन होताच महिलांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी मशाल पेटवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आमदार राहुल पाटील यांनी या स्पर्धेस मिळालेल्या उस्त्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व महिलांचे आभार व्यक्त केले. तीन दिवशीय महोत्सवातील प्रत्येक उपक्रम निश्‍चितपणे यशस्वी ठरतो आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post