जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांचे आंदोलन कृती समितीने काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा
परभणी/मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी  खाजगी मान्यताप्राप्त शाळेतील दि.1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्रचलित जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षकांनी एकत्र येत आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुनी पेन्शन योजना बचाव कृती समिती परभणीच्या वतीने आज  वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.  याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, दि.1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी मागील 10 ते 12 वर्षापासून सातत्यपुर्ण लढा सुरु आहे. परंतू कित्येक कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर कित्येक दुर्देवाने मयत पावले आहेत. अशांना अद्यापही कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामूळे त्यांचे जीवन अत्यंत हलाखीचे बनले आहे. शासन दरबारी अनेक वर्षापासून आम्हा कर्मचाऱ्यांची जुन्या पेन्शन योजनेसाठी 100% अनुदानाची अट रद्द करुन नियुक्ती दिनांक ग्राह्य धरुन नोव्हेंबर 2005 पुर्वीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रचलित जुनी पेन्शन योजना विनाअट विनाशर्त लागू करावी अशी मागणी मोर्चाद्वारे  करण्यात आली आहे.तरी ही  मागणी शासन दरबारी मांडून न्याय द्यावा, असे नमूद केले आहे  निवेदनावर 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अभिजित धानोरकर, दिगांबर मोरे, अशोक काला, डी. एम. गिरी, राजकुमार धबड यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post