स्वकुटूंबात दोन घरकुलासह शौचालयाचे दुबार अनुदान लाटणाऱ्या औराळा सरपंचांची जिल्हा परिषदेकडून पाठराखण !



अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीसह कारवाईसाठी तब्बल तिन स्मरणपञ; वाघमारे व पवार यांचे उपोषण सुरुच.

नांदेड - स्वकुटूंबात दोन घरकुलासाठीचा निधी व पतीच्या नांवे शौचालय बांधकाम व वापर अनुदान दुसर्‍यांदा संगणमतातून लाटणाऱ्या औराळाच्या सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे व कंत्राटी ग्रामसेवक आर.जी. मुदखेडे यांच्यावर चौकशीसह ठोस कारवाईऐवजी जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांची पाठराखण होत असल्याने या विभागाच्या तब्बल तिन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी तिसर्‍यांदा स्मरणपत्रातून सदर प्रकरणात योग्य त्या कार्यवाहीसह केलेल्या कार्यवाहीचे अनुपालन सादर करण्याचे आदेश दिलेले असून याप्रकरणात योग्यतेने चौकशीसह दोषींविरुद्ध ठोस कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते किरण वाघमारे व माजी उपसरपंच प्रल्हाद पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरुच आहे.

अधिक माहिती अशी की, नायगांव तालुक्यातील औराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन मालमत्ता क्रमांक २४० या पतीच्या नांवे असलेल्या मालमत्तेमध्ये ग्रामपंचायतीच्या मालमत्ता, नमुना नंबर ८ नोंदवहीत गवती छप्पर व रिकामी जागा अशी नोंद आहे.परंतू,त्या जागी  अनाधिकृतपणे पक्के घर बांधकाम केलेले होते व त्याजागी सद्या त्यांचे एकत्रित कुटुंब वास्तव्यास आहे.मात्र तरिही सदर कुटूंब कागदोपत्री विभक्त असल्याचे दाखवून पती सतिश नारायण वाघमारे व सासू अनिता नारायण वाघमारे या दोघांची नांवे शासनाच्या रमाई आवास योजनेतून मंजूर करुन घेतली असली तरिही प्रत्यक्षात एकाच घरकुलांचे बांधकाम सुरु करुन स्थानिकचे तत्कालीन ग्रामसेवक ए.एम.हाळदेवाड, कार्यरत कंत्राटी ग्रामसेवक आर.जी.मुदखेडे व बांधकाम विभागाच्या संबधित अभियंत्याच्या संगणमतातून यासाठीच्या निधीची उचल केली.याबाबत येथिल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व माहिती अधिकार कार्यकर्ते किरण वाघमारे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती प्राप्त करुन घेऊन संबधितांवर कारवाईसाठी प्रशासनाकडे पुराव्यानिशी तक्रार दिल्यानंतर नांदेडच्या जिल्हाधिकारीस्तरावरुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनेक पत्रानंतर  यापूर्वी पहिले स्मरणपञ दिले होते व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी देगलूरचे तत्कालीन सहा. गटविकास अधिकारी सी.एल.रामोड यांना गतवर्षी दि.१६ सप्टेंबर रोजी आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोनदा चौकशी समितींचे गठण करुन एका समितीत याच प्रकरणात दोषी असलेल्या नायगांव पंचायत समितीच्या शाखा अभियंता डि.व्ही.गोणेवार यांना व दुसर्‍या समितीत याच गांवात एका कूटूंबात दुबार घरकुलाचा लाभ दिल्याचा पोलीस दप्तरी गुन्हा नोंद असलेला नायगांव पंचायत समितीमधील व त्यावेळी बिलोली येथे कार्यरत शाखा अभियंता रोडगे यांचीही नियुक्ती करुन कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न केला होता. 


परंतू,या दोन्ही समित्या म्हणजे केवळ कागदावरच राहिल्या. चौकशी दरम्यान समितीचे अध्यक्ष रामोड यांनी वाघमारे यांच्याकडून पत्रासह तक्रारीनिहाय पुरावे घेऊन पोहच देणे टाळले होते तर,दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी केलेल्या चौकशीचा अहवाल तक्रारदारांच्या वेळोवेळी विनंतीसह वरिष्ठांच्या आदेशानंतरही स्वतः पदोन्नतीवर बदलून जातांना व अद्यापही वरिष्ठांना सादर केला नाही. त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेल्या या चौकशी अहवालाने सरपंच सौ.वर्षा वाघमारे व कार्यरत क॔त्राटी ग्रामसेवक आर.जी. मुदखेडे यांची चांगलीच पाठराखण झाली.त्यांचे मनोधैर्य बाढल्याने शासनाच्या योजनानिहाय विविध विकास कामांत व सोबतच,वैयक्तिक लाभांच्या अनेक योजनांत त्यांनी गैरव्यवहार करित सरपंचांच्या कुटूंबात यापूर्वीच तब्बल दोन वेळा घरकुल बांधकामासाठी तर,सरपंच पतीराजांना एकदा घरकुलासह शौचालय बांधकाम व वापर अनुदानाचा दुबार लाभ मिळविला.याबाबतही माहिती अधिकारातून माहिती घेऊन संबधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी किरण वाघमारे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरुच ठेवला.राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने या तक्रारीची दखल घेऊन राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव राजेश कुमार यांना दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी या प्रकरणात योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले होते.


 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही नायगांव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देऊन आपला कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतरही त्यांनी दोषींविरुद्ध स्वतः दूरच परंतू,वरिष्ठांच्या आदेशानंतरही प्रकरणात चौकशीच केली नाही. त्यामुळे किरण वाघमारे व प्रल्हाद पवार यांनी यापूर्वीच सुरु उपोषणाला बसल्यानंतर अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी या प्रकरणात तात्काळ चौकशीसह कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचे अनूपालन सादर करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व पंचायत या दोन्ही विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांना दि.२६ सप्टेंबरला दुसर्‍यांदा स्मरणपत्रातून या प्रकरणात चौकशीसह दोषींविरुद्ध ठोस कारवाईचे आदेश दिले होते.परंतू,सदर अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात अद्यापही चौकशीसह दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याने पूनश्च आज दि.१७ ऑक्टोबर रोजी संबधित तिन्ही अधिकाऱ्यांना तब्बल तिसऱ्यांदा स्मरणपत्र दिलेले आहे.मात्र सदर प्रकरणात चौकशीसह दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई होईपर्यंत माघार नसल्याचे स्पष्ट करून वाघमारे व पवार यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले आमरण उपोषण सुरुच ठेवले आहे

Post a Comment

Previous Post Next Post