सीसीटीएनएस प्रणालीत नांदेडचा प्रथम स्थान







नांदेड जिल्हा पोलीस दलाने मिळवले राज्यात दुसऱ्यांदा प्रथम स्थान सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस दलाची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. दरम्यान नुकत्याच लागलेल्या सीसीटीएनएस रेकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने राज्यात सतत दुस-या वेळेस प्रथम स्थान पटकावले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात नांदेड जिल्हयाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे..

मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडुन पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरी बाबतचा आढावा दर महीन्यात घेण्यात येतो राज्यातील सर्व घटकांचे माहे सप्टेंबर 2022 मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करून देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये नांदेड जिल्यातील 36 पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथमखबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम, अनओळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ / बेवारस मालमत्ता, प्रतीबंधक कार्यवाही य ईतर नोंदी अश्या एकुण 18 प्रकारच्या माहितीची सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये मध्ये वेळेत परिपूर्ण नोंदी करण्यात येतात. तसेच सीसीटीएनएस प्रणालीचा दैनदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध गुन्हे उघडकीस आणुन चांगली कामगिरी करण्यात आली तसेच ITSSO, ICJS ब Citizan Portal वरील e-Complaint, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव यांची ऑनलाईन अर्जाची वेळेत निर्गती व प्रभावीपणे वापर केल्याने माहे सप्टेंबर 2022 मध्ये नांदेड जिल्हवाने 232 गुणांपैकी 227 गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस नोडल अधिकारी मा. अपर पोलीस अधीक्षक नांदेड श्री निलेश मोरे, मा. अपर पोलीस अधिक्षक भोकर श्री. विजय कबाडे व त्यांची सीसीटीएनएस टीम पोलीस उप निरीक्षक रहिम बशीर चौधरी, पोलीस उप निरीक्षक प्रणिता बाम पोलीस नाईक समीरखान मुनीरखान पठाण, पोलीस नाईक ओंकार सुरेश पुरी, पोलीस कॉन्स्टेबल माधव नारायण येईलबाड यांचे परिश्रमामुळे नांदेड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यासाठी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी सीसीटीएनएस विभागाचे कौतुक केले आहे. तसेच भविष्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post