लग्नानंतर 21 दिवसातच तरुणाचा मृत्यू, पत्नी पोलिसांच्या ताब्यात, बीडच्या गेवाईमधील घटनाबीडमधील गेवराईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संशयावरून पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे.

पांडुरंग चव्हाण असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. पांडुरूंग याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.

गेवराई लुक्यातील निपाणी जवळका येथील पांडुरंग रामभाऊ चव्हाण या 22 वर्षीय तरुणाचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला. होता मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये त्याच्या पत्नीच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी गर्दी केली होती. पांडुरंग चव्हाण याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आता त्याच्या पत्नीला ताब्यात घेतल आहे.

पांडुरंग चव्हाण यांचा 21 दिवसापूर्वी विवाह झाला होता. मात्र रात्री अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला गेवराईच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पांडुरंग यांच्या मृत्यूला त्याची पत्नी कारणीभूत असल्याने नातेवाईकांनी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. आता पांडुरंगा याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच निष्पन्न होईल. तोपर्यंत त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.परिसरातून हळहळ दरम्यान, अवघ्या 21 दिवसांचा पांडुरंग याचा संसार उद्धवस्त झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पांडुरंग हा खूप मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे परिसरातील सर्वांसोबतच चांगले संबंध होते. नुकताच त्याचा विवाह झाला होता. नवा संसार असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला आणि अवघ्या 21 दिवसांचा संसारउद्धवस्त झालाय. धक्कादायक बाब म्हणजे पांडुरंग यांच्या मृत्यूला त्याची पत्नीलाच जबाबदार धरण्यात आलंय. एवढंच नाही तर तिच्यामुळेच पांडुरंग याचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पांडुरंग याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. परंतु, शवविच्छेदन अहवालानंतरच पांडुरंग याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला नाही. फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post