'पुन्हा काय झाडी, काय डोंगार...' मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार
3 महिन्यांपूर्वी सुरत व्हाया गुवाहाटी मुक्कामुळे राज्यातील सत्तानाट्याला रंगत वळण मिळाले होते. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपवर माघार घेण्याची नामुष्की आली. त्यातच आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक निवडणुकीसाठी आता शिंदे गटाने सावध सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसहित गुवाहाटीला जाणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि आपले सर्व 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाऊन कामख्या देवीचे दर्शन घेणार आहे.
Post a Comment

Previous Post Next Post