"शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटी रुपये देऊन फोडलं", राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उघडपणे सांगितलं.कोला : मला आता शिवसेनेचे एक आमदार भेटले. ते सांगत होते की, भाजप आणि शिंदेगटाने आमदारांना कसं फोडलं ते. 50 कोटी रुपये देऊन आमदारांना फोडल्यांचं त्यांनी सांगितलं.

त्या आमदारालाही 50 कोटीची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती नाकारली. ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले, असं म्हणतराहुल गांधी यांनी आमदारांना ऑफर केलेल्या पैशांवर भाष्य केलं. ते अकोल्यात बोलत होते.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रा अकोल्यात आहे. अकोल्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी शिवसेनेतील आमदार कसे फुटले यावरही भाष्य केलंय.

Post a Comment

Previous Post Next Post