७ नोव्हेंबरला सायंकाळी नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश...

भारत जोडो यात्रा पत्रकार परिषद, दि. १ नोव्हेंबर २०२२
भारत जोडो यात्रेला समर्थन दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वतीने सर्व पत्रकारांचं स्वागत... आणि त्या सर्व नेत्यांचंही आमच्या वतीने मनःपूर्वक स्वागत... 
कन्याकुमारी ते काश्मिर भारत जोडो यात्रा... ७ नोव्हेंबरला सायंकाळी नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश... 
देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही कायम टिकवण्यासाठी निघालेल्या पदयात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद... देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुलं-मुली, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींचा उत्स्फुर्त सहभाग... बेरोजगारी, महागाई, दडपशाही सारख्या मुद्यांवर लोक स्वतःहून आपल्या व्यथा राहुलजींकडे मांडत आहेत...
आमचा स्वतःचा अनुभव आहे की, सर्वसामान्य नागरिकांमध्ये यात्रेबद्दल प्रचंड, उत्सुकता, कुतुहल, आकर्षण... लोक स्वतःहून यात्रेत सहभागी होण्यास इच्छूक... रोज अनेकांचे फोन येतात... 
त्यामुळे या यात्रेसाठी ‘मी पण चालणार...’ हे घोषवाक्य आम्ही जाहीर करत आहोत... 
नांदेड जिल्ह्यातील यात्रेबाबत माहिती देण्यासाठी आम्ही 
९९३ ९९३ २२३३ हा मोबाईल क्र. आम्ही २ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेपासून सुरू करत आहोत... या मोबाईल क्रमांकावर फक्त नांदेड जिल्ह्यातील यात्रेबाबत माहिती दिली जाईल... 
त्याचप्रमाणे एलईडी व्हॅन्स, होर्डिंग्स, सोशल मीडिया अशा सर्व माध्यमातून भारत जोडो यात्रेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहोत... 
भारत जोडो यात्रा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून, एक लोकचळवळ बनली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनता दल अशा राजकीय पक्षांसह, लोकचळवळी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, विचारवंत अशा अनेक घटकांकडून भारत जोडोला यात्रेला समर्थन मिळाले आहे...
भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासादरम्यान वरील सर्व घटकातील नेते, प्रमुख मंडळी विविध ठिकाणी सहभागी होणार आहेत... नांदेड जिल्ह्यातसुद्धा अनेक मंडळी सहभागी होणार आहेत... त्यांचे ट्रॅव्हल प्लान तयार झाले की दोन-तीन दिवसांत त्याबाबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल... 
भारत जोडो यात्रेचे देगलूर आगमन ७ नोव्हेंबरला निश्चित आहे... सायंकाळच्या सुमारास ते तेलंगणातून प्रवेश करतील... देगलूर नगर परिषदेशेजारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर त्यांचे स्वागत... 
नांदेड जिल्ह्यात त्यांचे देगलूर, शंकरनगर रामतीर्थ, वझरगा फाटा आणि पिंपळगाव महादेव असे चार मुक्काम असतील... दरम्यान भोपाळा (८ नोव्हेंबर) व कृष्णूर एमआयडीसीला (९ नोव्हेंबर) कॉर्नर मिटिंग असेल... 
१० नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता नांदेड शहरातील देगलूर नाक्यावरून पदयात्रा प्रारंभ... बाफना टी पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुथा चौक वजिराबाद, कलामंदीर, शिवाजीनगर, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा... आणि १० नोव्हेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास नवा मोंढा मैदान, नांदेड जाहीर सभा...  

भारत जोडो यात्रेने एक नवा इतिहास निर्माण केला आहे. जगभरात त्याची दखल घेतली जाते आहे. ही यात्रा आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे आणि या यात्रेचे प्रत्यक्ष स्वागत करण्याचे, त्यात सहभागी होण्याची संधी नांदेड जिल्ह्याला लाभणार आहे... 
हे अतिशय मोठे आयोजन... मी यापूर्वीही अनेक कार्यक्रम केलेत... गुरुता गद्दी त्रिशताब्दी वर्षाचा सोहळा देखील एक मोठे आयोजन होते... तशाच प्रकारचे मोठे आयोजन भारत जोडो यात्रेचे आहे... आमची संपूर्ण टीम मागील महिन्याभरापासून कामाला लागली आहे... 
मला पूर्ण विश्वास आहे की भारत जोडो यात्रेसाठी आपल्या सर्व पत्रकार मित्रांकडून देखील आम्हाला सहकार्य मिळेल... यापूर्वीही नेहमीच आपण सहकार्य केले आहे... तेच प्रेम कायम राहिल, याचा विश्वास आहे... 
धन्यवाद...

Post a Comment

Previous Post Next Post