हिमायतनगर महावितरण अधिकाऱ्याचा मनमानी कारभार; २०१४ पासून शेतकरी वीजपुरवठ्याच्या प्रतीक्षेत

वीज असूनही कनेक्शन अभावी शेतकऱ्याचे रब्बी पीक नुकणीच्या वाटेवर;
कार्यालय उघडे अभियंत्याच्या खुर्च्या मात्र नेहमीच रिकाम्या असतात - डवरे यांचा आरोप

 
हिमायतनगर | शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा व तातडीने वीज कनेक्शन देण्याचे आदेश शासनाचे असताना हिमायतनगरात मात्र सण २०१४ पासून कोटेशन भरूनही वीज कनेक्शन मिळत नाही. चपला झिजवून शेतकरी हैरण झाला मात्र अद्यापही गरजू शेतकऱ्यास वीज कनेक्शन मिळाले नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. एव्हडेच नाहीतर कधीही कार्यालयात आले असता सबंधित अधिकारी भेट नाही असा आरोपही सीताराम तुकाराम डवरे त्यांनी केला आहे. हिमायतनगर महावितरण कार्यालयात जबाबदार अधिकारीच कर्तव्यात कसूर करत असल्याने शेतकऱ्याला नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. याबाबतची तक्रार वरिष्ठाकडे केली असल्याचे तक्रारकर्त्यानी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.


हिमायतनगर तालुक्यातील वाशी येथील शेतकरी सीताराम तुकाराम डवरे यांनी २२ डिसेंबर २०१४ ला आपल्या शेतीसर्वेमध्ये विहिरीसाठी थ्री फेज वीज कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केला. एव्हडेच नाहीतर यासाठी लागणारी कोटेशन ५ हजार २०० रुपयाची रक्कम भरणा केली आहे. त्यानंतर वीज कनेक्शन मिळेल आणि रब्बी हंगामात पिके घेऊन उत्पादन काढू या आशेत होते. मात्र वीज कनेक्शन देण्यास शेजारील शेतकरी आणि अधिकाऱ्यांमुळे अडचण येते आहे. परिणामी शेतकरी गेल्या ८ वर्षांपासून हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयाकाढून अधिकृत वीज कनेक्शन मिळेल या प्रतीक्षेत चकरा मारत आहेत. एकतर स्वतंत्र डीपी उभारुन वीज पुरवठा द्यावा नाहीतर कुठल्याही डीपीवरून पोलच्या माध्यमातून वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी केली आहे. अनेकदा तोंडी आणि लेखी सूचना देऊनही संबंधित महावितरण अधिकारी वीजकनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ चालवीत आहेत असं त्यांचा म्हणणे आहे.

वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे या महिन्यात ७ तारखेला लेखी तक्रार दिली, परंतु अद्यापही वीजकनेक्शन मिळाले नाही. गेल्या काही दिवसापासून महावितरण कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र सहाय्यक अभियंता भडंगे हे कार्यालयात उपस्थित राहत नाहीत आणि भेटत नसल्याने शेतकऱ्यास व याकामासाठी नेहमी ये-जा करणाऱ्या त्यांच्या भावास आणि इतर वीज ग्राहकास चपला झिजण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने दोन दिवसपीर्वी अभियंत्याच्या मनमानी भरभाराचा पाढा उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांच्याकडे वाचला. रखडलेले वीज कनेक्शन देण्यास भडंगे वेळ लावत असतील तर मी तुमचे कनेक्शन जोडून द्यायला लावतो. तसा अर्ज द्या असे सांगितल्याने वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आज दि.११ रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास तक्रारी अर्ज घेऊन आला. यावेळी कार्यालयातील दोन्ही अभियंत्यांचे कक्ष उघडे होते. मात्र दोघेही आपल्या खुर्चीवर अनुपस्थित दिसून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महावितरण कार्यालयात सुरु असलेल्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

जवळचा असलेल्या डीपीवरून वयक्तिक खर्चाने केबल टाकून वीज पुरवठा नेण्यास आजूबाजूच्या शेतकरी वर्गातून विरोध केला जात आहे. त्यामुळे आमच्या शेतीपिकाचे नुकसान होते आहे. म्हणून रब्बी हंगामात पेरणी केलेले पीक धोक्यात आले आहेत. शेताजवळ वीज असताना आणि रितशीर कोटेशन भरून वीज कनेक्शनची मागणी करूनही वीज जोडणी मिळत नाही. त्यामुळे माझ्यावर आर्थिक संकट आले असून, वीज कनेक्शन मिळाले नाहीतर मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही अशी संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्याने निवेदनातून दिली आहे.      

याबाबत पत्रकारांनी देखील महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱयांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही अभियंते कार्यालयात हजार नव्हते. येथे असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली तर साहेब बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post