व्याजाचे पैसे देऊन ही युवकाला शिवीगाळ करत केली मारहाण; धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


अनामत (खड्डा) फायनान्स च्या नावावर लोकांची लुट 

धर्माबाद (लखन काबले) धर्माबाद येथील  आमेर खुरेशी इब्राहिम खुरेशी वय 24 व्यवसाय मजुरी करणारा युवक हा गांधीनगर येथील  रहिवासी असून घरगुती कामासाठी दोन वर्षांपूर्वी त्याला पैशाची गरज पडली होती. त्यावेळी काही मित्रांकडून कळले की, आपल्याच गांधी नगर मधील साईनाथ मोहिते, संदिप मोहीते हे व्याजाने पैसे देतात. त्यामुळे आमेर खुरेशी हा मोहिते बियर शाॅप  जाऊन भेटला भेटल्यावर तुम्ही व्याजाने पैसे देता का ? तुमच्याकडे सावकारी अधिनियमनव्ये व्याजाने पैसे देण्याचा कोणता परवाना आहे का ? त्यावर संदिप मोहीते यांनी असा कोणताही परवाना नसून आजपर्यंत अनेकांना व्याजाने पैसे दिल्याचे सांगितले.तुम्हाला हवे आहे का ? पैसे हवे 

असल्यास सांग मी व्याजाने पैसे देत नाही मी अनामत रक्कम (खड्डा) फायनान्स म्हणून देतो जर माझ्याकडून १० हजार घेतले तर दर आठ दिवसाला  मला ८०० रुपये व्याज द्यावे लागतात. पाहिजे असेल तर सांग असे मला  असे मोहिते‌ यांनी अमेर कुरेशी ला सांगितले  पैशाची गरज असल्यामुळे आमेर ने १५ हजार रुपये घेतले व दर आठ दिवसाला १२०० रुपये बरेच हाप्ते दिलो .व एका दिवशी पुर्ण १५ हजार परत केलो आहे. अमेर यांनी मोहिते यांच्या खात्यावर आॅनलाईन फोन पे गुगल पे वर व्याज व  रोख रक्कम १५  हजार परत दिले. १५ हजार रुपये याच्या बदल्यात जवळपास तब्बल ३०-३५ हजार रूपये व्याज व  मुद्दल परत फेड केली. माझे अजून तु व्याजाचे २हजार रुपये दे म्हणून शिवीगाळ करत १२नोहेंबर रोजी १० रात्री च्या सुमारास  थांबवून मला म्हणाले की राहिलेले पैसे दे 

असे म्हणून मला थांबविले मी त्यांना म्हणालो की भैया मैं आपको पुरे पैसे दे दिया फिर भी तुम ब्याज कैसा मंगरे आसे मनाले आसता   तुझ्याकडे आमचे पैसे अजून येणे बाकी आहेत  म्हणून शिवीगाळ केली व हातातील मोबाईल काढून घेतले व मनाला कि पैसे दे मोबाईल घेऊन जा मि मोबाईल मागायला गेलो असताना त्या ठिकाणी त्याचा भाऊ साईनाथ मोहिते  आला व आमचे पैसे द्यायचा असुन खोटं बोलत आहेस असे म्हणून रबरी पाइपाने दोन्ही हातावर पाठीवर कमरेवर मुक्का मार दिला त्यावेळेस माजीद खान राहणार देवी गल्ली व सलमान खान राहणार कुंठागल्ली 

यांनी येऊन सोडवा सोडवा केली. परंतु त्यांनी पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली रात्री जास्त उशीर झाल्यामुळे पोलीस स्टेशनला मी आलो नाही म्हणून आज १३ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात येऊन सर्व प्रकार सांगितला असता पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी पत्रक घेऊन दिल्यावर उपचार करून घेऊन मी जवाब दिला आहे तरी त्या दोघाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमेर यांनी मागणी केली आहे आमेर यांनी दिलेल्या तक्रार (जबाब) वरून भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post