देगलूर नाका परिसरात राहुल गांधी आले पण सामान्य जनतेला नाराज केले

नांदेड दि. 16 भारत जोडो यात्रे च्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नांदेड जिल्ह्यामध्ये एन्ट्री तर जोरदार झाली पण नांदेड शहरांमध्ये इंट्री मात्र जनतेला नाराज करणारी ठरली कारण देगलूर नाका परिसरामध्ये राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सर्वसामान्य जनता ही सकाळपासूनच वाट पाहत होती राहुल गांधी यांचा देगलूर नाका परिसरामध्ये प्रवेश झाला त्यावेळी सकाळपासून ताटकळत वाट पाहत उभे असलेल्या जनतेची घोर निराशा झाली अनेक नगरसेवकांना देखील राहुल गांधी यांना भेटता आले नाही कारण या परिसरात काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले नियोजन हे सर्वसामान्य जनतेसाठी नव्हतेच हे नियोजन होते केवळ वरिष्ठ काँग्रेस नेतेमंडळी,  

त्यांची मुले आणि नातेवाईक व आघाडीतील इतर नेत्यांच्या सोयीचे असेच करण्यात आले होते मातब्बर नेत्या शिवाय सर्वसामान्य जनता आणि नगरसेवकांना राहुल गांधी यांच्यासोबत चालण्याची संधी देखील देण्यात आली नाही देगलूर नाका परिसर हा काँग्रेस पक्षाचा गडबंबला जातो काँग्रेस परिवारावर प्रेम करणारी जनता या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे सर्वांना माहीत आहे असे असून देखील सर्वसामान्य जनतेच्या व राहुल गांधी यांच्या संवादाच्या दृष्टीने कोणत्याच प्रकारचे प्रभावी नियोजन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले नव्हते त्यामुळे या परिसरातील नागरिकांची घोर निराशा झाली आणि त्यांना असेच म्हणण्याची वेळ आली की राहुल गांधी आले आणि सर्वसामान्य जनतेला नाराज करून गेले. असी चर्चा नागरिकां मध्ये होत आहे 

Post a Comment

Previous Post Next Post