भाजपासमोर आव्हान कुणाचं? काँग्रेस की आप; या ओपिनियन पोलनं वाढवलं मोदी-शाहांचं टेन्शनगुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढला आहे. एकीकडे अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला टक्कर देण्यासाठी केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

तर काँग्रेसही भाजत जोडो यात्रेमुळे उत्साहात आहे.

भाजपाकडून यावेळच्या निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र ओपिनियन पोलच्या अंदाजांमधून भाजपाला तितकेसे समर्थन मिळताना दिसत नाही आहे.

ने नुकताच एक ओपिनिय पोल जाहीर केला असून, त्यातील आकड्यांमुळे भाजपाच्या महत्त्वाकांक्षांना धक्का बसू शकतो. तर काँग्रेस आणि आपकडून कडवी टक्कर मिळताना दिसत आहे.

या ओपिनियन पोलनुसार १८२ जागा असलेला गुजरात विधानसभेत भाजपाला १०४ ते ११९ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ५३ ते ६८ आणि आपला ० ते ६ जागा मिळू शकतात. इतरांच्या खात्यामध्ये ० ते ३ जागा जाऊ शकतात. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाला ९९ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या.

ओपिनियन पोलनुसार मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ४९.५ टक्के, काँग्रेसला ३९.१ टक्के आणि आपला ८.४ टक्के आणि इतरांना ३ टक्के मते मिळू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post