मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत केला- प्रा.शेख नजीर

नांदेड दि.11स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत करण्याचे कार्य भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केले असे प्रतिपादन प्रा.शेख नजीर यांनी केले ते कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित  कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.उस्मान गणि हे होते. 


प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुकतरे यांनी केले. पुढे प्रा.शेख नजीर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण व्यवस्थेत अनेक अमुलाग्र बदल करून सक्षम व रोजगारक्षम पिढी घडवण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते त्यामुळे हे शिक्षण व्यवस्था ही प्रभावी असली पाहिजे आणि ती प्रभावी करण्यासाठी या शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देण्याचे कार्य मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केले. त्यामुळे आजची शिक्षण व्यवस्था ही देशांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम ठरली आहे.


 शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या या योगदानामुळेच भारत सरकार द्वारे 2008 पासून मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.खान नदीम परवेज यांनी केले तर आभार प्रा.अब्दुल अहद यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. निजाम इनामदार, प्रा.दानिश, प्रा.बाबासाहेब भुकतरे,प्रा. इब्तेसाम,रब्बानीसर,मो.मोहसीन,गौस खान पठाण आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची उपस्थिती होती

Post a Comment

Previous Post Next Post