बिस्लेरीची डीलरशीप घेऊन करा लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या एजन्सी घेण्याची प्रक्रियामुंबई: जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला बिस्लेरी कंपनीची एजन्सी घ्यायची असेल आणि त्यासाठी काय करावं लागतं, हे समजत नसेल, तर आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला देणार आहोत.

बिस्लेरी डीलरशिप घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. बिस्लेरी कंपनी बाटलीबंद पाणी विकते आणि ते बाजारातील एक विश्वासार्ह नाव आहे. बिस्लेरी डीलरशिप घेण्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागेल आणि त्यासाठी अप्लाय कसं करायचं असतं, ते जाणून घेऊयात. बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिपपूर्वी मार्केट रिसर्च करा कोणताही बिझनेस सुरू करण्यापूर्वी मार्केट रिसर्च करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

मार्केट रिसर्चद्वारे तुम्हाला प्रॉडक्ट्सची संपूर्ण माहिती मिळू शकते. तसंच तुम्ही होलसेल की रिटेल कोणत्या प्रकारचा बिझनेस करू शकता, याचीही माहिती आधी घ्या. ही सर्व माहिती घेतल्यानंतरच डिस्ट्रिब्युटरशिपसाठी अर्ज करा. 
जागेची आवश्यकता तुम्हाला कोणत्याही बिझनेससाठी जागेची आवश्यकता असते.

बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिपसाठी बाटल्या ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं गोडाउन लागेल आणि एक दुकानही लागेल. या डीलरशिपसाठी तुम्हाला सुमारे 2500 ते 3000 स्क्वेअर फूट जागा लागेल. खर्च जर तुम्हाला बिस्लेरी डिस्ट्रिब्युटरशिप घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम खर्च करावी लागेल. तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये लागण्याची शक्यता आहे.

जर तुम्ही जागा, कर्मचारी आणि डीलरशिपच्या खर्चाची गोळाबेरीज केली, तर तुम्हाला जवळपास इतका खर्च करावा लागेल. 
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस - सर्वांत आधी तुम्हाला बिस्लेरी कंपनीच्या www.bisleri.com या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. - इथं होम पेज उघडेल, तिथे खाली तुम्हाला Contact Us चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. - तिथे क्लिक केल्यावर, तुम्हाला एक फॉर्म दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि ठिकाण यासारखी सर्व माहिती भरावी लागेल. - संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल. - फॉर्म सबमिट केल्यावर, संपूर्ण डिटेल्स कंपनीकडे जातील आणि त्यांच्याकडून तुमच्याशी संपर्क साधला जाईल. आवश्यक कागदपत्रं आयडी प्रूफ - आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा व्होटर आयडी, अॅड्रेस प्रूफ - रेशन कार्ड किंवा वीज बिल, तुमच्या बँक अकाउंटचं पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, फोन नंबर, ई-मेल आयडी, एज्युकेशन डॉक्युमेंट, जीएसटी नंबर, प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स, जमिनीची कागदपत्रं, लीज अग्रीमेंट आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) या कागपत्रांची आवश्यकता असेल.

Post a Comment

Previous Post Next Post