सांगली येथील तिसऱ्या अधिवेशनात परभणी पदाधिकाऱ्यांचा सहभाग
परभणी /मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी/  सांगली येथील  महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली  तिसऱ्या अधिवेशन दिनांक ( दि .१६ ) सांगली येथील मराठा सेवा सांस्कृतिक भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या तिसऱ्या अधिवेशनात सांगली मिरज कुपवाडा महापौर दिग्विजय सूर्यवंशी , महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन उपाध्यक्ष उदय चौधरी मुंबई , केंद्रीय जनरल सेक्रेटरी भारत प्रवीण कुमार गोंडा सांगली , निवारा बांधकाम कामगार संघटनेचे ज्योतीराम कुरकुंडे जिल्हा बिड , पालघरचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील परभणी जिल्हाध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल ,यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले सांगली येथील महाराष्ट्र निवारा बांधकाम कामगार फेडरेशन आयटकचे महाराष्ट्रात कार्य चालते फेडरेशनच्या वतीने मागील वर्षापासून वेळोवेळी बेमुदत आंदोलने करून बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या राज्य सरकार कडून मान्य केले योजनांची अंमलबजावणी करून बांधकाम कामगारांच्या पदरात लाभ पडले आहे बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहसाठी ५१ हजार रुपये आर्थिसाहाय्य योजना अमलात आणली,

 नोंदीत बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची योजना कामगार मंडळास भाग पाडले ,काही ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली  आजच्या अधिवेशनात पुढील काळात दरवर्षी दिवाळीच्या वेळेस दहा हजार रुपये बांधकाम कामगारांना बोनस मिळावा , राज्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना शासकीय जमीन अल्प दरात उपलब्ध करून घरकुले बांधून देण्यात यावे , सर्व बांधकाम कामगारांना ६० वर्षा नंतर दरमाह ३ हजार रुपये पेन्शन सुरू करावी अशी मागण्यांची राज्य शासनाकडे यावेळी करण्यात आली या जोरदार अधिवेशनाच्या आंदोलनाला परभणी निवारा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल ,पवन कुटकरी, शेख शमशोद्दिन आदि पदाधिकारी , कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post