ईकळीमाळ येथे दलित वस्तीत करण्यात आलेल्या सी.सी.रस्त्याची चौकशी साठी दोन दिवसा पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू

 नायगाव / प्रतिनीधी / नायगाव तालुक्यातील ईकळीमाळ येथील अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा जिल्हा परिषदेची २०२१-२२ अंतर्गत तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा सी.सी.रस्ता हा वेगवेगळा तीन वस्तीतील इस्टीमेट नुसार काम न करता एकाच वस्तीत निधीचा वापर करून निधी हडप करणाऱ्या सरपंच व ग्रामसेविकांच्या  कार्यकाळातील कामांची चौकशी करून चौकशी अंती दोषींवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी दि.१५ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

      नायगाव तालुक्यातील ईकळीमाळ येथे २०२१ते२०२२ या वर्षात जवळपास १३ लाख ५० हजार रुपयांच्या वर निधी मंजूर झाला होता यात  अनु जाती नवबौद्ध घटकांतील आंबेडकर दलित वस्तीत दोन लाख रुपये सी सी रस्ता, नविन दलित वस्तीत दोन लाख पन्नास हजार रुपये व आंबेडकर दलित वस्तीत नऊ लाख रुपये सी सी रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला असताना इस्टीमेनंट नुसार न करता सर्वच निधी काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सी सी रस्त्यांवर पुन्हा थुका पाॅलिस करुन एकाच वस्तीत वापर करून निधी सरपंच व ग्रामसेविकांच्या मनमानी कारभार करुन हाडप केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे 

    सदर निधी हा ईकळीमाळ येथील तिन्हीही वस्तीच्या विकासासाठी मंजूर झालेला होता परंतु ग्रामसेवक यांनी तिन्हीही वस्तीचा निधी नविन दलित वस्ती गट क्रं.२९९ गायरान जमीन येथे अनु जाति नवबौद्ध जातीच्या कुटुंबांची घरे असुन सदरील कुटुंब हे गेल्या ४० ते ५० वर्षांपासून तेथे वास्तव्यास राहत असल्यामुळे ग्रामसेवक यांनी गट क्रमांक २९९ मध्ये समाज कल्याण विभागांचा १३ लाख पन्नास हजार रुपये निधी हा तिन्हीही वस्तीत वापर न करता एकाच सी सी रस्त्यासाठी वापर केला आहे. विशेष म्हणजे २०२२ निधी हा अनु जाति नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी रस्ता केला असताना ग्रामसेवक विद्या मोरे यांनी त्यांच वस्तीतील लोकांना दि.१२ ऑटोबर रोजी घरे व झोपडी हटविण्याची नोटीस दिली आहे.सदरील वस्तीत राहणा-या अनु जाती नवबौद्ध लोकांची वस्ती ग्रामसेविकांना मान्य नसेल तर अनु जाति नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यात आलेल्या निधी तिन्हीही वस्तीचा निधी एकाच वस्तीतील रस्त्यावर रस्ता करुन जवळपास तेरा लाख पन्नास हजार रुपये उचल केली कशी? यांची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक विद्या मोरे यांच्यावर गुन्हा नोंद करून उचल केलेली रक्कम शासकीय खाती भरुन पुन्हा ज्या दलित वस्तीत निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचं वस्तीत पुन्हा नव्याने काम करण्यांत यावीत व गट क्रं.२९९/२९२ येथे वास्तव्यास असलेल्या अनु जाति नवबौद्ध घटकांची घरे नियमित करुन द्यावी यासाठी दि.१५ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर सुर्यवंशी व्यंकटराव खंडोजी, रामचंद्र हैबती सुर्यवंशी,दिगांबर गोविंद सुर्यवंशी, शंकर जमनाजी जोंधळे सह आदींनी आमरण उपोषणाला सुरू केले आहे .


चौकट.......


विद्यमान ग्रामसेविका विद्या मोरे ह्या २०१७ते २०२१ या वर्षांत नरगंल येथे असताना चौदा वित्त आयोगाच्या निधीतुन थातुरमातुर कामे केली अशी तक्रार जिल्हा परिषद सीईओ , आ.राजेश पवार , गटविकासाधिकारी नायगाव यांच्या कडे गावातील नागरिकांनी केले होते .त्या वेळी तात्काळ चौकशी करावी असे आदेश आ.पवार यांनी जि.प.सीईओना दिले होते. पण या बाबत कोणीच चौकशी केली नाही .

Post a Comment

Previous Post Next Post