स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम (जन्म दिनानिमित्य )(हमीद एम. सुलेमान श्री. उपाध्यक्ष, नगर परिषद कंधार)

मोलाना आझादचे वडील मौलाना मुहम्मद खेरोद्दीन हे आपल्या पूर्वजा प्रमाणे गाढे विद्वान धर्मगुरु व सुफी (यवादी) होते. संयम आणि साधेपणा यांना त्यांच्या जीवनात फार महत्वाचे स्थान होते. चिंतन आणि अध्ययन यात ते डुबून गेलेले असत. दिल्लीच्या परीसर बाहेरील त्यांच्या शिष्यगण गुजरात, मुंबई पर्यंत हजारोंनी पसरलेला होता. सन १८५७ साली (मुंबईहून) मक्केला गेले.


मक्केतील धर्मगुरु शेख महंमद यांच्या कन्ये बरोबर मौलाना खैरोद्दीन यांचे लग्न झाले. या दोन् विज्ञान शेख घराण्यात मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी पवित्र भुमी मक्केत झाला. मौलाना आझाद चे पूर्ण नांव गुलाम मोहियोद्दीन अहमद होते. मौलाना आझाद १८९० रोजी आई-वडिलांसोबत हिन्दूस्थान मध्ये कलकत्यात आले. मोलाना आझाद हे बुध्दीवंत होते व उर्दू, फारसी, अरबी आणि इंग्रजी भाषेचे प्रसिध्द होते. त्यांनी १९०८ साली विदेश पहिला दौरा इराक, शाम, अरबस्थान, तुर्कस्थान, मीसर, फ्रान्स व इतर देशात केला.


महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व त्यांच्या बरोबरीने स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे मौलाना अबुल कलाम आझाद धर्म निष्ठ होते. गांधीजी व आझाद यांनी बहुसांस्कृतीक बहुधर्मिय व एकात्म भारताचे स्वप्न पहिले आणि त्यासाठी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद हा आधार मानला. महात्मा गांधी भारतात येण्यापूर्वी पासून मौलाना आझाद हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. १९१२ साली सुरू केलेल्या "अलहीलाल" या वृत्तपत्रामधून त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याची खंबीर मांडणी केली होती.. मौलाना आझाद यांनी कॉंग्रेसचे नेते म्हणून महंमद अली जीनांच्या फुटिरता वादी भुमिकेला नेहमीच कट्टर विरोध केला. १९२० पासूनच्या सर्व स्वातंत्र्य लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी कारावास भोगला. इतकेच नव्हे तर ८ ऑगस्ट १९४२ रोजी जो 'चले जाव' चा ऐतिहासिक ठराव पास करण्यात आला त्या मुंबई येथील अतिभव्य व स्फुर्तिदायी काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत समर्थ असे नेतृत्व प्रदान केले होते. आचार्य अत्रेंनी त्या अधिवेशनाचे उत्तम वर्णन केले आहे. त्यांच्या विषयीचा अपार आदरभाव प्रत्येक स्वा सैनिकाच्या मनात होता.


मौलाना आझाद हे थोर धर्म पंडीत (मौलाना) होतेच. परंतू त्यांचे ललित लिखान ही अत्यंत भारदस्त मोहक व दिलखेच होते. त्यांच्या लेखनाचा संग्रह 'गुब्बार-ए-खातिर व त्यांनी लिहीलेले पुस्तक 'इंडिया विन्स फ्रीडम सुप्रसिध्द आहे.


मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या त्यांच्या आत्मचरित्रात लिहतात बंगालने हे आव्हान स्विकारले. राजकीय क्षेत्राचा आणि क्रांतीचा अभूर्तपूर्व असा स्फोटच बंगालमध्ये झाला. श्री अरविंद घोष बडोद्याहून कलकत्त्याला आले आणि त्यांनी कलकत्ता हे आपल्या चळवळीचे केंद्र बनविले. याच काळात मौलाना आझाद हे श्री श्यामसुंदर चक्रवती यांच्या सहवासात आले. चक्रवती हे प्रमुख क्रांतीकारक होते. त्यांच्या मार्फत आझादांचा इतर क्रांतीकारकांशी संपर्क आला व अरविंद घोष यांच्याशी त्यांची भेट झाली. मौलाना आझाद क्रांतीकारकाच्या चळवळीकडे आकर्षीत झाले व त्यांचे 'अलहिलाल' वृत्तपत्र इंग्रजांनी बंद केले. १९१५ साली मौलाना आझाद यांनी 'अलबलाघ' नावाचे दुसरे वृत्तपत्र सुरु केले.


मौलाना आझाद हे अत्यंत प्रभावी असे वक्ते होते. जनते मध्ये राजकीय जागृती करण्यासाठी आपल्या लेखणी प्रमाणेच आपल्या वाणीचाही ते तसाच उपयोग करीत असत आणि त्यासाठी त्यांचे निरनिराळ्या प्रांतात सतत दौरे असत. त्यांचे दौरे बंद पाडण्यासाठी इंग्रज सरकारने एका मागुन एक अशा तन्हेने निरनिराळ्या प्रांतात प्रवेश करण्यास बंदी घातली आणि अखेर त्यांना अटक करून रांची येथे स्थानबध्द करण्यात आले. तर ही मौलाना आझाद यांनी सुरू केलेली जागृती करण्याचे कार्य थांबविले नाही.


मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. दुसऱ्या निवडणूकीत ही लोकसभेचे सदस्य पदी निवड झाली व पुन्हा १९५७ मध्ये शिक्षणमंत्री झाले व भारताच्या घटनेचे सदस्य होते.


२२ फेब्रुवारी १९५८ साली त्यांचे निधन झाले, जामा मस्जिद दिल्लीच्या समोर उर्दू पार्क मध्ये त्यांचा दफनविधी करण्यात आला.


मौलाना अबुल कलाम आझाद कुराणाचे जग मान्य भाष्यकार भारताचे थोर सेनापती, काँग्रेसचे विख्यात अध्यक्ष, हिंदू-मुस्लिम एकतेचे थोर पुरस्कर्ते, मोहक व रसिक लेखक आणि स्फुर्तिदायी व प्रेरणादायी वक्ते म्हणून भारतरत्न मोलाना अबुल कलाम आझाद हे भारतीय इतिहासात अजरामर राहतील.Post a Comment

Previous Post Next Post