वाढीव विद्यार्थी संख्या अनुदानासाठी प्रयत्न करणार – प्रधान सचिव सुमंत भांगेनांदेड दि. २४, राजस्थानी शिक्षण संस्थेच्या श्री रामप्रताप मालपाणी मुकबधीर शाळेच्या वाढीव विद्यार्थी संख्या अनुदानासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे नांदेड दौऱ्यावर आले असता गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी राजस्थानी शिक्षण संस्थेच्या मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्रीरामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयात सदिच्छा भेट देत शाळांची भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती घेतली. यानंतर त्यांनी विद्यार्थी गुणावता वाढीसाठीच्या प्रयत्नाबद्दल शिक्षकांची प्रशंसा केली.

यावेळी माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, म.न.पा. आयुक्त डॉ. सुनील लहाने,  जि. प. समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी,  लातूरच्या प्रादेशिक समाजकल्याण कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गोडबोले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता संजय गोडगोडवार, संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, प्रभारी उपाध्यक्ष कमल कोठारी, बद्रीनारायण मंत्री आदींची उपस्थिती होती,
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी श्रीरामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयाचा शासन स्तरावर प्रलंबित असलेला वाढीव विद्यार्थी अनुदानाचा प्रश्न यासमवेतच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच विद्यार्थ्याच्या आरोग्याबाबतही सजग असून आरोग्य शिबिराचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. शाळांच्या सर्व उपक्रमाचा आढावा घेतल्यानंतर प्रधान सचिव सुमंत भांगे यांनी विद्यार्थी गुणावता वाढीसाठीच्या प्रयत्नाबद्दल शिक्षकांची प्रशंसा केली.


 

शिक्षकांसाठी आशेचा किरण
तब्बल १५ वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर अल्पवेतनावर काम करणाऱ्या व विनाअनुदानित तत्वावरच सेवानिवृत्त होण्याची भीती असणाऱ्या या प्रशिक्षित शिक्षकांसाठी राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांचे आश्वासन व यासाठी सातत्याने पाठपुरावा करित असलेल्या जि. प. समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार यांचे प्रयत्न शिक्षकांसाठी आशेचा किरण ठरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post