पोलीस ठाणे बिलोली हदीतील आव्हानात्मक खुनाच्या गुन्हयाचा स्था. गु.शा. नांदेड कडून छडा
दिनांक 08/11/2022 रोजी पोस्टे बिलोली हदीतील सगरोळी शिवारातील जंगलामध्ये एका पुरुष जातीच्या इसमाचा अर्धवट जळालेला मतदेह मिळून आल्याने पोलीस ठाणे बिलोली येथे आज्ञात इसमाच्या विरुध्द गुरनं 223 / 2022 कलम 302, 201 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. द्वारकादास चिखलीकर तसेच इतर वरीष्ठ अधिका-यांनी भेट दिली होती. सदर गुन्हयातील मयत व्यक्ती अर्धवट जळाल्याने त्याची ओळख पटविणे व मारेक-याचा शोध घेणे हे खूप मोठे आव्हानात्मक काम पोलीसा पुढे उभे होते. मा. पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. द्वारकादास चिखलीकर यांना आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक करुन सदर गुन्हची उकल करण्या बाबत सूचना दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक श्री. द्वारकादास चिखलीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधीकारी कर्मचारी यांचे दोन पथक तयार करुन त्यांना सदर गुन्हया संदर्भात घटनास्थळाचा तांत्रिक पुरावा तसेच सभोतालच्या परिसरातील सी.सी.टि.व्ही कॅमेरे व गोपनीय बातमीदार नेमूण त्यांचे कडून माहिती घेऊन सदर गुन्हा उघड करण्या बाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंघाने स्था.गु.शा. येथील दोन पोलीस पथकांनी तेलंगाना राज्यातील व महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील प्रत्येक गावात जाऊन तसेच विविध पोलीस स्टेशनला संपर्क साधून मयताशी मिळती जुळती व्यक्ती काही दिवसापासून मिसिंग आहे का याबाबत कसून तपास केला तसेच तांत्रिक बाबीचे विश्लेषन केले. तरीही काही एक उपयुक्त माहिती मिळत नव्हती. दिनांक 19/11/2022 रोजी पोलीस निरीक्षक श्री. द्वारकादास चिखलीकर साहेब स्था. गु.शा. नांदेड यांना सदर गुन्हा तेलंगाणा राज्यातील मिर्झापूर जि. कामारेडडी येथील एका इसमाने केल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच पोलीस पथक सदर ठिकाणी पाठवून सदर संशईत इसम नामे महेंदर नारायणा बोब्बासानी वय 36 वर्षे रा. झेंडा गल्ली, मिर्झापूर मंडळ नसरुल्लाबाद जि. कामारेडडी यात महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवरील कार्ला चेक पोस्ट येथून ताब्यात घेऊन त्यास सदर खुना बदल विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने गणेश व्यंकय्या चुंचू रा. नसरुल्लाबाद जि. कामारेडडी यास त्याचे जवळ असलेली मोटार सायकल देत नसल्याचा राग मनात धरुन त्यास दारु पाजवून सगरोळी शिवारातील जंगल परिसरात घेऊन जाऊन गणेशच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन तसेच डोक्यावर हेलमेटने मारुन त्याचे आंगावर पेट्रोल टाकून जाळून जिवे ठार मारल्याची कबूली दिल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी सदर आरोपी पोलीस ठाणे बिलोली येथे हजर केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, नांदेड, श्री. खंडेराव धरने, भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्री. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, पोहेकॉ गुंडेराव करले, संजय केंद्रे, शंकर म्हेसनवाड, पोकॉ देवा चव्हाण, महेश बडगु, मोतीराम पवार, तानाजी येळगे, बजरंग बोडके, रवी बाबर, राजू सिटीकर, दिपक ओढणे, अच्युत मोरे, चालक हेमंत बिचकेवार, दादाराव श्रीरामे, यांनी पार पाडली आहे.

सदर कामगिरी बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी सर्व पथकाचे
अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post