टिपू सुलतान हे धर्म सहिष्णू राजे होते: शेख सुभान आली किनवट येथे राष्ट्रीय एकात्मता परिषद संपन्न!
किनवट(अकरम चव्हाण) :-स्वातंत्र्य वीर शहीद टिपू सुलतान हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक आहेत ते धर्म सहिष्णू राजे होते.त्यांनी १५६ मंदीरांना देणग्या दिल्याचा पुरावा आज ही मैसुर गैझेटीयर मध्ये उपलब्ध आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यंग इंडियाच्या २३ जानेवारी १९३० च्या अंकात म्हणतात, टिपू सुलतान खरा धर्म सहिष्णू होता. इंग्रजांनी टिपू ला बदनाम केले टिपू सुलतान च्या महलाच्या ४ ही बाजुने श्रीवेंकटरमना, श्रीनिवास,श्रीरंगनाथ चे मंदीर या गोष्टीचा स्पष्ट पुरावा आहे की टिपू सुलतान धर्म सहिष्णू होते हिंदू प्रजेवर प्रेम करणारे होते असे मत टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख शेख सुभान अली यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्य सेनानी शहीद टिपू सुलतान जयंती,संविधान दिवस आणी प्रबोधनकार ठाकरे स्मृति दिना निमित्त टिपू सुलतान ब्रिगेड किनवट आयोजित राष्ट्रीय एकत्मता परिषद काल दिनांक १८ रोजी सायंकाळी तहसील मैदानात संपन्न झाली.या वेळी मंचावर कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख शेख सुभान अली,भीम टायगर सेनेचे दादासाहेब शेळके,मुफ्ती अजिज खान,गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष एड.प्रदीप राठोड, यांच्या सह माजी नगराध्यक्ष साजिद खान,माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन,माहूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमित येवतिकर,डॉ.मोफिक खान,पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी,यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना सुभान अली म्हणाले राष्ट्रीय प्रतीक राष्ट्र निर्माणाची प्रेरणा असतात आणी स्वातंत्र्य वीर टिपू सुलतान एकमेव सर्वात पहले शहिद आहेत जे इंग्रजा विरूद्ध लढताना रणांगणात शहिद झाले आहेत म्हणून स्वातंत्र्य वीर टिपू सुलतान यांची जयंती राष्ट्रीय बलीदानाची प्रेरणा म्हणून साजरी करायला हवी,संविधानाच्या मूळ प्रतीत त्यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रतच्या पृष्ठ १४४ अध्याय १६ मध्ये स्वातंत्र्य वीर टिपू सुलतानचे छायाचित्र आहे.जि विचारधारा संविधानाला वीरोध करते तीच विचारधारा स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान यांचा विरोध करते आणी जो कोणी टिपू सुलतानला विरोध करत आहे तो संविधानाच्या मूळ प्रतीच्या अस्तित्वालाच विरोध करत आहे आणि म्हणून तो राष्ट्रद्रोही संबोधला जावू शकतो,म्हणून कोणीही अज्ञानपोटी ही राष्ट्रीय प्रतिके,संविधान यांचा विरोध करता कामा नये असे ते म्हणाले.या वेळी भीम टायगर सेनेचे दादासाहेब शेळके,मुफ्ती अजिज खान,गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष एड.प्रदीप राठोड साजिद खान,अभय महाजन,यांनी स्वातंत्र्य वीर टीपू सुलतान यांच्या व अनेक महापुरुषांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला.या वेळी अकबर खान युसुफ खान, प्रास्ताविक डॉ.मोफिक खान, संचलन जकिर सर यांनी तर सय्यद नदीम यांनी आभार मानले.समाजात बंधुभाव निर्माण करून सामाजिक एकता आणी राष्ट्रीय एकात्मता सशक्त करणारा अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन किनवट येथील टिपू सुलतान ब्रिगेडचे सय्यद नदीम शब्बीर खान,शेख फयाज,अल्माज खान,शेख जुबेर,शेख जावेद,शेख सद्दाम,शेख आसिफ,अमीर खान,शेख मुणवर,यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post