फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मा.प्रधान सचिव यांना पुढील मागण्यांबाबत मुद्देसूद निवेदन दिले

 नांदेड ( प्रतिनिधी )ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शाॅपकिपर्स फेडरेशन च्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या समावेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.विजय वाघमारे यांनी दिनांक 02/11/2022 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस संबंधित विभागाच्या उप सचिव श्रीमती नेत्रा मानकामे  उपसचिव श्री. गजानन देशमुख अवर सचिव कोळेकर, आशिष आत्राम, सागर कारंडे यांच्या समवेत ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉप किपर फेडरेशन पुणे चे पदाधिकारी उपस्थित होते.फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मा.प्रधान सचिव यांना पुढील मागण्यांबाबत मुद्देसूद निवेदन दिले, मा.प्रधान सचिव यांनी  १ ) ई-पाॅज मशीन बाबत लवकर 5 जी  सुधारणा करण्यात येईल व नेटवर्क बाबत सुधारणा करण्यात येईल २ ) धान्य ज्या महिन्याचे त्या महिन्यात देण्याचा प्रयत्न करण्यात येईल ३ ) सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना प्रधान मंत्री योजनेचे कमीशन देण्या बाबत सूचना देण्यात येतील ४ ) नवीन मशीन मध्ये नाव कमी करणे वाढवणे सुविधा देण्यात येतील ५ ) धान्य ज्या वेळेला दुकानात येईल  त्याच वेळेला मशीन मध्ये अपलोड करण्यात येईल ६ ) आनंदाच्या शिध्याला मुदत वाढ देण्यात येईल व इतर योजनेच्या धान्यचा आढावा घेऊन मुदत वाढ देण्यात येईल ७ ) गॅस सिलेंडर बाबत दुकानदाराला वितरणा बाबत विचारणा करण्यात येईल  ८ ) आय .एस.ओ.बाबत सक्ती करण्यात येणार नाही .९ ) कोरोना काळात मृत्यु पावलेल्या दुकान दारांच्या कुटुंब्याना आर्थीक मदत मिळावी १०) कमीशन वाढीबाबत मा . मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री संबधीत खात्याचे मंत्री व कॅबीनेट पुढे हा विषय ठेऊन पाठपुरावा करण्यात येईल  या बैठकीला ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉप किपर फेडरेशन पुणे चे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाने,शांताराम पाटील ,अशोक एडके, शहाजी लोखंडे ,शंकर सुरोशे ,विवेक भेरे . दिलीप नवले ,फारूख शेख,निवृती महाराज कापसे ,अण्णा शेटे ,अप्पा तोडकरी ,राज्यातील इतर पदाधिकारी उपसतीत होते .

Post a Comment

Previous Post Next Post