कार अनाचक आग लागली तारासिंग मार्केट परिसरातील घटना, दुचाकीसह तीन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

 


नांदेड : प्रतिनिधी
शहरातील तारासिंग मार्केट परिसरात रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अनाचक आग लागली. आगीच्या या तांडवात एका कार व दुचाकी जळून खाक झाली. तर शेजारी असलेल्या तीन दुकानांना आगाची झळ बसली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशामक दलाने अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळेपुढील दुर्घटना टळली. शहरातील तारासिंग मार्केट परिसरातील
जोगिंदरसिंग रामगडीया, वक्षीसिंग जहागीरदार यांच्या घराशेजारी उभ्या

असलेल्या एका चार चाकी कारला आणि दुचाकीला आज रविवारी दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली. रविवार असल्यामुळे येथील
बाजारपेठेत नेहमी पेक्षा वर्दळ कमी होती. मात्र काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. रस्त्यावरून जाणाऱ्या आणि काही सुरू केली. तोपर्यंत या आगीच्या तांडवात रस्त्यालगत उभी असलेल्या एका इलेक्ट्रिकल

दुकानदारांनी मदतीसाठी आरडाओरड
दुकानासह अन्य दोन दुकानांना कवेत घेतले. या आगीचे लोट आणि धूर या परिसरात दूरवर दिसून येत होता. त्यामुळे भितीने लोकांची धावपळ सुरू झाली. वाजारपेठेत काही दुकाने सुरू होती, तीही बंद करण्यात आली. आग वाढत असल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते अशोकसिंह हजारी यांनी याबाबत तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. तसेच वजिराबाद पोलिसांनाही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह अन्य पोलिस व अग्निशमन दलाचे जवान आपल्या वाहनासह घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत कार व दुचाकी

तसेच इलेक्ट्रिकलचे एक दुकान जळून खाक झाले होते. अन्य दोन दुकानांना आगीची झळ बसली. सुदैवाने कारच्या टावर अथवा इंधनाच्या टाकीच स्फोट झाली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु या ठिकाणी एका

लग्न समारंभामध्ये फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली.त्यातील काही फटाके कारच्याखाली असलेल्या कचऱ्यामध्ये पडून त्या कचऱ्याने पेट घेतला असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post