जीवन हे अमूल्य आहे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये - आ.माधवराव पाटील जवळगावकर



शेतकऱ्यांनी हिम्मतीने अडचणींचा सामना केला पाहिजे; शेतकरी कुटुंबाना सानुग्रह अनुदान वितरित
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील काळात हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजाराची कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत. जीवनात चढ उतार येत असतात अश्या वेळी शेतकऱ्यांनी हिम्मतीने अडचणींचा सामना केला पाहिजे जीवन हे अमूल्य आहे. आपले जीवन संपविल्याने अडचणी सुटणार नाहीत उलट कुटुंबाचा आधारवड गेल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होते. अशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी सर्वानी अमूल्य जीवनाचे महत्व समजून घ्यावे. आणि संघर्षाला तोंड देत कुटुंबासाठी जगायला शिकाव असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.

हिमायतनगर तहसील कार्यालयात आज मयत शेतकरी वारसदारांना आणि वीज पडून दगावलेल्या गाई, म्हशीच्या शेतकरी पालकांना शासनाकडून उपलब्ध झालेल्या मदतीचा धनादेश हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते मंगळवार दि.१५ रोजी देण्यात आला. यावेळी ते पत्रकारांच्या माध्यमातून जनेतला आवाहन करताना बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, यंदा खरीप हंगामात विजांचा कडकडाट होऊन अतिवृष्टी झाली. या काळात तालुक्यातील काही शेतकरी वीज अंगावर पडल्याने मयत झेल तर काही शेतकऱ्यांनी पिके नुकसानीत आल्याच्या चिंतेने जीवन यात्रा संपविली आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतातील जनावरांवर वीज पडल्याने दगावली आहेत. या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात म्हणून सानुग्रह अनुदान प्राप्त झाले आहे. तर आणखी काही शेतकऱ्यांचे अनुदान प्रपात होणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना देखील लवकरच अनुदान दिले जाईल. परंतु अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये. यंदाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी खचला आहे, परंतु शेतकऱ्यांनी खचून न जाता अडचणींचा धैर्याने सामना करावा. आपल्या कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून शेतकऱ्यावर असते. आत्महत्या हा संकटावर मात पर्याय नाही त्यामुळे कोणीही असा विचार मनात आणू नये असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले.  

यावेळी तहसीलदार डी.एन. गायकवाड, गटविकास अधिकारी मयूर आंदेलवार, नायब तहसीलदार अनिल तामस्कर, नाजीमचे संचालक गणेशराव शिंदे, माजी कृउबा संचालक शेख रफिक सेठ, सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, माजी तालुकाध्यक्ष जनार्धन तांडेवाड, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण, शहराध्यक्ष संजय माने, अब्दुल बाखी, राजू पाटील पारवेकर, खालिद भाई, पंडित ढोणे, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे व शिवसेनेचे राजकीय पदाधिकारी, लाभार्थी, पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post