कुख्यात डॉन अरूण गवळीबद्दल घेतला 'हा' निर्णयकुख्यात डॉन अरुण गवळीला त्याच्या मुलाच्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

कारागृह उपमहानिरीक्षक यांनी चार दिवसांचा पॅरोल पोलीस बंदोबस्तात नेण्याची अट घातली होती. पण नागपूर खांडपीठाने  काही अटी रद्द करत विना बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय दिला आहे.

कुख्यात डॉन अरुण गवळीचा लहान मुलाचा 17 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विवाह होणार आहे. यासाठी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे पॅरोलसाठी अर्ज केला होता. यात कारागृह प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताचा खर्च करावा अशा अटी शर्तीसह चार दिवसाचा पॅरोल (Parole) मंजूर केला होता. यासह पाच लाखाची रोख सुरक्षा आणि 5 लाख जमीनदार सादर करण्याची अट घातली होती.
यात नागपूर खंडपीठाने पोलीस बंदोबस्ततात जाण्याची अट रद्द केली.


 

सुरक्षा ठेव 1 लाख आणि प्रत्येकी जमीनदार 1 लाख रुपये केली आहे. तसेच चार दिवसापेक्षा अधिक रजेच्या अरुण गवळीच्या अर्जावर कारागृह उपमहानिरीक्षक यांनी कायद्यानुसार पण वेळेत निर्णय घ्यावा. त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नसल्याचे न्यायमूर्ती विनय जोशी आणि वृषाली जोशी यांनी सुनावणी दरम्यान म्हटले आहे.

पत्नीच्या आरोग्यासाठीही पॅरोल:

याआधीही अरूण गवळीला पत्नीच्या आरोग्यासाठी रजा मिळावी म्हणून पॅरोल मिळाला होता. पत्नी आजारी पडल्यानं विभागीय आयुक्तांकडे त्यांनी अर्ज केला होता.


 

काय आहे प्रकरण:

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2 मार्च 2007 रोजी मुंबईमधील असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी 2008 मध्ये अरुण गवळीला अटक केली होती. 2012 साली विशेष न्यायलयाकडून अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post